सलमान खान हाोस्ट असलेल्या '
बिग बॉस 8' हा रिअॅलिटी शो चार आठवडे पुढे ढकलण्यात आला आहे. हा निर्णय केवळ टीआरपी वाढवण्यासाठी घेण्यात आला असल्याचे समजते. मात्र, यामुळे बॉलिवूडमधील अत्यंत बिझी शेड्यूल असलेल्या अभिनेत्यांपैकी एक
सलमान खानचे शेड्यूल विस्कळीत झाले आहे.
सलमान सध्या 'बजरंगी भाईजान' बरोबरच 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटांची शूटिंग करत आहे. या शूटिंगदरम्यान ब्रँड प्रमोशनचेदेखील शेड्यूल आखण्यात आले आहे. 'बिग बॉस 8' चे जवळपास एक महिना पुढे ढकलण्यात आलेल्या शेड्यूलचा सलमानच्या उर्वरित कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, डिआंड्रा आणि गौतमच्या प्रेम प्रकरणाला गरोदरपणाचे मिळालेले वळण, सोनालीचे गौतमला चिडवणे आणि तिने उपेंद्रशी जवळीक साधण्याचा शो शेवटच्या टप्प्यात असताना केलेला प्रयत्न यामुळे शो ला भरपूर टीआरपी मिळाला. यादरम्यान सलमाननेदेखील गौतमबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे 'बिग बॉस 8' मध्ये लवकरच मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गेल्या आठवड्यात 'बिग बॉस'च्या मंचावर आलेल्या सोनम कपूर आणि अरबाज खानची खास झलक...