आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ‘Bigg Boss 8’ Gets Extension For 1 Month; Farah Khan To Become New Host!

\'बिग बॉस 8\'मधून सलमान आऊट, फराह इन, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'बिग बॉस\'चे आठवे पर्व एक महिन्याने पुढे ढकलण्यात आले आहे. बातम्यांनुसार, शो आता जानेवारी नव्हे फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. शोच्या निगडीत एका सूत्राने याची पुष्टी दिली आहे. आता बातमी आहे, की शो एक महिना पुढे ढकलल्यामुळे सलमान शोला वेळ देऊ शकणार नाही.
सलमानचा करार केवळ चार महिन्यां अर्थातच 4 जानेवारीपर्यंतच होता. त्यानंतर त्याने आपल्या तारखा इतर प्रोजेक्टला दिल्या आहे. आता सलमान या शोला 4 जानेवारीनंतर होस्ट करू शकणार नाही.
 
सलमान शो होस्ट करणार नाही तर त्याच्याऐवजी फराह खानचे नाव पुढे आले आहे. बातमी आहे, की फराह खानने ही ऑफर स्वीकारली आहे. एका प्रतिष्ठित वृत्तपत्रानुसार, फराहने करारसुध्दा साइन केला आहे.
 
फराह स्वत: हा शो बघते आणि शोची फॅनसुध्दा आहे. आता फराह शो होस्ट करून प्रेक्षकांचे मनोरंजन करते, की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.