('बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा विजेता ठरलेल्या गौतम गुलाटी आणि डिआंड्रासोबत करिश्मा तन्ना)
मुंबईः शनिवारी रात्री 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा धमाकेदार ग्रॅण्ड फिनाले रंगला. यावेळी मलायका अरोरा खान, सोनाक्षी सिन्हा आणि
रोहित शेट्टी या सेलिब्रिटींनी
आपली हजेरी लावली होती. या सेलेब्सच्या धमाकेदार परफॉर्मन्सेसनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या अंतिम फेरीत 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वातील माजी स्पर्धकांनीसुद्धा उपस्थिती लावली होती.
'दीया और बाती हम' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता गौतम गुलाटी या पर्वाचा विजेता ठरला. करिश्मा तन्ना आणि गौतम गुलाटी यांच्यात विजेतेपदासाठी चुरस रंगली होती. फराह खानने विजेता म्हणून गौतमच्या नावाची घोषणा करताच करिश्माच्या चेह-यावर हावभाव बघण्यासारखे होते.
सुरुवातीला करिश्माने हसून गौतमला शुभेच्छा दिल्या आणि त्याची गळाभेट घेतली. मात्र स्टेजवरुन खाली उतरताना तिच्या चेह-यावरील उदास भाव स्पष्ट दिसत होते. स्टेजवरुन खाली उतरताच तिने तिची बेस्ट फ्रेंड असलेल्या डिआंड्राला अलिंगन दिले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गौतम गुलाटी विजेता ठरल्यानंतर क्लिक झालेली करिश्मा तन्नाची छायाचित्रे...