आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BIGG BOSS-8: \'बिग बॉस\' ची एका वेगळ्या ढंगात सुरुवात, सलमान दिसला वैमानिकाच्या रुपात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कलर्स वाहिनीवरील बहुप्रतिक्षित शो 'बिग बॉस-8' ला रविवारपासून सुरुवात झाली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार आणि कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानने आपल्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर शो प्रस्तुत केला. बिग बॉसच्या घरात 12 स्पर्धकांच्या प्रवेशानंतर इतर तिघांचा प्रवेश झाला. ते तिघे आहेत आर जे प्रितम, दीपशिखा आणि पुनीत इस्सर. या तिघांना हायजॅक करुन 'बिग बॉस' च्या घरात पाठवण्‍यात आले. घरातील सिक्रेट सोसायटीनुसार इतर घरांतील सदस्यांवर हुकूम गाजवण्‍याचा आदेश बिग बॉसने त्या तिघांना दिला आहे.
शोचा होस्ट सलमान यावेळी वैमानिकाच्या गेट-अपमध्‍ये दिसला. याप्रसंगी त्याने 'किक' चित्रपटातील 'हँग ओव्हर' आणि 'जुम्मे की रात' या गाण्‍यांवर डान्स केला. 'बिग बॉस'चे घर हे घर नसून ते एक विमान आहे, असे सलमानने सांगितले. खाली वाचा बिग बॉसच्या घरात आलेल्या प्रत्येक स्पर्धकांविषयी...
सर्व प्रथम सोनाली राऊत आणि करिष्‍मा तन्नाची एंट्री
शोमध्‍ये सर्वप्रथम सलमानने बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊतची ओळख करुन दिली. टीव्ही अभिनेत्री करिष्‍मा तन्नाविषयी सांग‍ितले आणि त्यांचे पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना घरात प्रवेश दिला.

उपेन पटेल बनला तिसरा स्पर्धक
'किक' या चित्रपटातील आयटम गीत 'मर जावा' वर डान्स करत उपेनने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.
पाचवा सदस्य बनला आर्य बब्बर
बॉलिवूड अभिनेता राज बब्बरचा मुलगा आर्य बब्बरने घरात पाचवा सदस्य म्हणून प्रवेश केला. सिंघम स्‍टाइलमध्‍ये आर्यने दामदारपध्‍दतीने प्रवेश केला.
सहावे आणि सातवे स्पर्धक म्हणून डिआंड्रा आणि सुशांत
मॉडल आणि अभिनेत्री डिआंड्रा सॉरेसने सहावे स्पर्धक म्हणून प्रवेश केला. यानंतर सुशांत डिग्विकरने प्रवेश केला. गायिकेच्या आवाजात सलमानबरोबर सुशांतने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.

गौतम आणि सुकृतीने केला घरात प्रवेश
आठव्या आणि नवव्या क्रमांकाने अनुक्रमे सुकृती कांडपाल आणि गौतम गुलाटीने घरात प्रवेश केला आहे. दोन्ही सेलेब्सने चित्रपट 'हंसी तो फसी'च्या गीतावर डान्स केला.
प्रणीत भट्टचे 'शकुनी'च्या भूमिकेत प्रवेश
'महाभारत' या मालिकेत शकुनीच्या भूमिका करणा-या प्रणीत भट्टने आपल्या वास्तव पात्राच्या वेशभूषेत ब‍िग बॉसच्या घरात प्रवेश केला. त्याने 'अता माझी सटकली'वर डान्स करुन 10 स्पर्धक म्हणून घरात प्रवेश केले आहे.

कमली या ग‍ीतावर डान्स करत ली नतासा स्टेनकोव्हिकचा प्रवेश
शोची 11 वी स्पर्धक म्हणून नतासा स्टेनकोव्हिकने प्रवेश केला. त‍िने कमली.. आणि बेबी डॉल ग‍ीतांवर ठुमके लावत घरात आली.
12 वी स्पर्धक ठरली मिन‍िषा लांबा
बॉलिवूड अभिनेत्री मिन‍िषा लांबाने 12 वी स्पर्धक म्हणून ब‍िग बॉसच्या घरात प्रवेश केला. तिने प्यार की ये कहानी सुनो या ग‍ीतावर प्रवेश्‍ा केला.