आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 8: नॉमिनेशनमुळे निर्माण होणार गोंधळ, पाहा Day-4 in Pix

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करिश्मा तन्ना आणि सोनी सिंह)
मुंबईः 'बिग बॉस 8' हा शो सुरु होऊन जेमतेम तीन दिवस झाले आहेत. मात्र या तीन दिवसांतच घरातील सदस्यांमधील इगो प्रॉब्लेम्स समोर येऊ लागले आहेत. सोबतच गटबाजी आणि कपटनीतीला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस'च्या चौथ्या दिवसाची सुरुवात घरातील किचनचे दार उघडताच झाली. सोनी आणि करिश्मा किचनवर ताबा मिळवताना दिसल्या. त्यांनी काही नियम तयार केले, मात्र इतर सदस्यांना ते नियम पसंत पडले नाहीत. त्यानंतर प्रत्येकांनी आपापले मत नोंदवायला सुरुवात केली. याशिवाय आज घरातील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करायचे आहे.
पुढे वाचा, कसे होते 'बिग बॉस 8'च्या चौथ्या दिवशी घरातील वातावरण...
पर्व बदलले मात्र नियम तेच...
बिग बॉसचे आत्तापर्यंत सात पर्व प्रेक्षकांनी बघितले आहेत. याच्या फॉर्मेटमध्ये काही बदल बघायला मिळालेत, मात्र घरातील नियम तेच आहेत. असेच काहीसे आठव्या पर्वातसुद्धा पाहायला मिळत आहे. घरातील नियम मोडणा-या सदस्याला शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. घरात हिंदी बोलणे आणि दिवसा झोप न घेणे, हे नियम यंदाच्या पर्वातसुद्धा कायम आहेत. नियम मोडणा-या सदस्याला शिक्षा देण्याची जबाबदारी सिक्रेट सोसायटीला देण्यात आली आहे. चौथ्या दिवशी सोनाली इंग्रजी बोलल्यामुळे आणि गौतम दिवसा झोपल्यामुळे त्यांना सिक्रेट सोसायटीने चेतावनी देण्याऐवजी शिक्षा ऐकवली. दोघांनीही नियम तोडल्यामुळे त्यांना विमानाच्या पंख्यांवर उभे राहण्यास सांगण्यात आले. चौथ्या दिवशी उपेन पटेलला बघून तो डियांड्रा आणि गौतमच्या रोमान्समुळे खुश नसल्याचे दिसले.
नॉमिनेशनचा खेळ आणणार वादळ...
नॉमिनेशन बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाच्या फॉर्मेटप्रमाणेच आहे. या प्रक्रियेनंतर घरातील सदस्यांमध्ये मैत्री आणि शत्रुत्वाचा खेळ रंगणार हे नक्की. चौथा दिवस संपता संपता नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु झाली. घरातील प्रत्येक सदस्याला कोणा दोन व्यक्तींना नॉमिनेट करण्यासाठी सांगण्यात आले. इतेकच नाही तर ज्या सदस्यांना नॉमिनेट करायचे होते, त्यांची छायाचित्रे आगीत टाकून त्यांनाच का नॉमिनेट केले? याचे कारणसुद्धा सांगायचे होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा DAY 4ची छायाचित्रे...