आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या प्रश्नावर भडकला सलमान, म्हणाला 'सिंगल वाईट दिसतो का?'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'च्या पत्रकार परिषदेत सलमान खान)
मुंबई: काल मुंबईमध्ये 'बिग बॉस 8'च्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूड अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खानने पत्रकारांच्या प्रश्नांनी उत्तरे दिली. पत्रकारांनी शो संबंधित काही प्रश्न तर विचारलेच सोबतच त्याच्या खासगी आयुष्याबद्दलीही त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जॅकलीन फर्नांडिससोबतच्या अफेअरविषयी सलमानला विचारताच त्याचा पारा चढला. तो म्हणाला, 'जर मी म्हणालो, की मी कुणासोबतच नात्यात नाहीये, तर हे ऐकून तुम्हाला आनंद होईल का?' याशिवाय लग्नाच्या विषयावरसुध्दा सलमान भडकला होता. तो म्हणाला, 'माझ्या लग्नात तुम्हाला काय रुची आहे, मी सिंगल आनंदी वाईट दिसतो का?'
आमिर खानची उडवली खिल्ली
आमिर सलमानचा चांगला मित्र आहे आणि ते नेहमीच एकमेकांवर खिल्ली उडवताना दिसतात. 'बिग बॉस 8'च्या पत्रकार परिषदेतसुध्दा असेच झाले. सलमानला विचारण्यात आले, की 'बिग बॉस 7'दरम्यान त्याने हॅट घालून 'धूम 3'चे प्रमोशन केले होते. आता आमिरचे म्हणणे आहे, सलमानने विवस्त्र व्हावे. आमिरसाठी सलमानचे काय उत्तर आहे? सलमानने विनोदी स्वरात उत्तर दिले, 'आजकाल आमिर आयपॉड लावून फिरत आहे. त्याचे ट्रन्सिस्टर हरवले आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'बिग बॉस 8'च्या पत्रकार परिषदेत सलमानने सांगितले, सलमानने का घेतला पुनरागमनाचा निर्णय, सोबतच, पक्षपाताच्या आरोप आणि कुशालशी झालेल्या भांडणावर काय म्हणाला सल्लू...?