आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: सना घरातून Out, म्हणाली, 'गौतम किंवा प्रीतम जिंकल्यास होईल आनंद'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एविक्शननंतर फराह खानसोबत सना खान)
मुंबई- 'बिग बॉस'च्या घरात या आठवड्यात सना खानचे एविक्शन झाले. तिने 'हल्ला बोल' सीरीजअंतर्गत चॅलेंजरच्या रुपात शोमध्ये एंट्री केली होती. परंतु आपले कौशल्य दाखवण्यात ती अपयशी ठरली.
सना खान 'बिग बॉस' 6व्या पर्वात स्पर्धक म्हणूनसुध्दा शोमध्ये आली होती. त्यावेळी आशका गोराडियासोबत लेस्बिअन किसमुळे ती चर्चेत आली होती. मात्र, त्यावेळी ती शोमध्ये शेवटपर्यंत टिकली होती. परंतु या पर्वात तिला दुस-या आठवड्यातच घराबाहेर जावे लागले.
घराबाहेर जानाता तिने संभावनाला आपली सर्वात चांगली मैत्रीण म्हणून संबोधले. तसेच 'बिग बम'चा वापर करून तिने महक चहलला पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट केले. याशिवाय तिने असेही म्हटले, की प्रीतम किंवा गौतम यांच्यापैकी कुणीही जिंकला, तरी तिला आनंद होईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस हल्ला बोल'मधील सनाचा प्रवास...