आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BIGG BOSS-8 : ...आणि उपेन ओरडल्यामुळे सुकिर्तीला कोसळले रडू, पाहा Day-2 in Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुकिर्ती कांडपाल)
मुंबईः ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक कार्य हे आव्हानात्मक असतं, ही गोष्ट ‘BB08’ फ्लाइटच्या पॅसेंजर्सच्या लक्षात आली आहे. आता त्यांनी ‘बिग बॉसच्या फ्लाइटमधील अनुभवांना गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आहे. सिक्रेट सोसायटीची आपल्यावर करडी नजर असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. दुस-या दिवशी ‘बिग बॉस’च्या पॅसेंजर्सना एक-दोन नव्हे तर तब्बल चार टास्क दिले. झोपेतून उठल्यानंतर दुस-या दिवसाची सुरुवात झाली. तर दोन पॅसेंजर्स त्यांना पहिल्या दिवशी मिळालेला कुर्बानी टास्क रात्रभर पूर्ण करत होते. सिक्रेट सोसायटीने हे काम उपेन पटेल आणि गौतम गुलाटीला सोपवले होते.
पाणीपुरवठा करण्यात आला बंद...
सकाळी उठताच फ्लाइटमधील पाणीपुरवठा बंद झाल्याचे पॅसेंजर्सच्या लक्षात आले. याचदरम्यान त्यांच्यासाठी एका नवीन टास्कची घोषणाम करण्यात आली. त्यानुसार, पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन पॅसेंजर्सना सतत सायकल चालवायची होती.
...आणि सुकिर्तीला कोसळले रडू
चोवीस तासांतच फ्लाइटमध्ये रडण्याचा क्रमसुद्धा सुरु झाला होता. दुस-या दिवशी उपने सुकिर्तीवर ओरडला, त्यामुळे सुकिर्तीचे डोळे पाणावले. सुकिर्ती रडत असल्याचे पाहून उपेनने तिला नौटंकी असे म्हटले.
टास्कवर टास्क...
जसा जसा दिवस वर येत होता, तसतशी पॅसेंजर्सची परीक्षा वाढत होती. सिक्रेट सोसायटीने दोन पॅसेंजर्सना टास्कअंतर्गत जेवण न करण्यास सांगितले. त्यानंतर सिक्रेट सोसायटीने दिलेल्या एक नवीन टास्कने सर्व पॅसेंजर्स अचंबित झाले. या टास्कनुसार, कोणत्याही दोन पॅसेंजर्सना चालणे-फिरणे बंद करायचे होते. अर्थात त्यांना स्टॅच्युच्या रुपात उभे राहायचे होते. डिआंड्रा आणि सुशांतने हे आव्हान स्वीकारले. त्यांना मायकल जॅक्सनच्या स्टाइलमध्ये हात वर करुन उभे राहण्यास सांगण्यात आले. सर्वच टास्क पॅसेंजर्सनी शांती आणि आनंदाने पूर्ण केले. आता हीच शांती घरात कायम राहणार की ही वादळापूर्वीची शांतता आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दुस-या दिवसाची क्षणचित्रे...