आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिन्सवर भडकली मंदाना, म्हणाली- \'कॅप्टन आहेस माझा बाप नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिन्स नरूला आणि मंदाना करिमी
 
मुंबई- \'बिग बॉस\'च्या 20व्या दिवशी अरविंद वेगडेची विदाई झाली. शनिवारी (31 ऑक्टोबर) अरविंदचे एव्हिक्शनची घोषणा होस्ट सलमान खानने केली. विशेष म्हणजे या आठवड्यात एक, नव्हे तर दोनजण एव्हिक्ट होणार आहे. अरविंदच्या एव्हिक्शननंतर सलमानने सांगितले, की नॉमिनेटेड इतर स्पर्धकांमधील एकजण रविवारी घराबाहेर येणार आहे. 
 
मंदानाला जावे लागले तुरुंगात- 
\'बिग बॉस\'ने घरातील कॅप्टन प्रिन्स नरूलाला विचारले होते, की घरात सर्वात जास्त कोण त्रास देतो? यावर प्रिन्सने मंदानाचे नाव घेतले. त्यानंतर \'बिग बॉस\'च्या आदेशानुसार, प्रिन्सने मंदानाला लिव्हिंग एरियामध्ये असलेल्या तुरुंगात बंद केले. मात्र अरविंदच्या एव्हिक्शननंतर तिला बाहेर काढण्यात आले. 
 
मंदानाच्या नजरेत किश्वर उत्कृष्ट कॅप्टन- 
सलमानने मंदानाला विचारले, की तिच्या नजरेत प्रिन्स आणि किश्वरपैकी कोण उत्कृष्ट कॅप्टन आहे. मंदानाचे किश्वरचे नाव घेतले. त्याचप्रकारे प्रिन्सला विचारण्यात आले, की सर्वात जास्त नियम तोडणारी व्यक्ती कोण? यावर प्रश्नावर त्याने मंदानाचे नाव घेतले. सलमानच्या सांगण्यानुसार रिमी सेन सर्वात जास्त नियम तोडणारी व्यक्ती आहे. कारण ती नॉमिनेशनविषयी चर्चा करते. याची परवानगी कुणालाच नसते. 
 
प्रिन्सवर भडकलेली मंदाना म्हणाली, \'कॅप्टन आहेस माझा बाप नाही\'
शनिवारीच्या (31 ऑक्टोबर) एपिसोडमध्ये मंदाना प्रिन्सवर भडकली होती. एका टास्कदरम्यान मंदानाने रागात स्वत:चा माइक काढून फेकला होता. यादरम्यान प्रिन्स तिला वारंवार माइक घालण्याची विनंती करत होता. मात्र मंदानाने माइक घालणार नाही असा हट्ट धरला. नंतर जेव्हा या मुद्यावर मंदाना आणि प्रिन्सचे सलमानसमोर भांडण झाले तेव्हा मंदाना प्रिन्सला म्हणाताना दिसली, की प्रिन्स तिचा कॅप्टन आहे बाप नाही. 
 
\'चाबी मास्टर\' आहे रोशेल मारिया राव- 
शनिवारीच्या (31 ऑक्टोबर) एपिसोडमध्ये रोशेलने सांगितले, की तरुणांनीच नव्हे तर तरुणींनीसुध्दा मर्यादेत राहायला हवे. यावर मंदानाने तिचा \'चाबी मास्टर\' म्हटले. मंदानाच्या मते, रोशेलला दुस-यांच्या भांडणात हस्तक्षेप करायला आवडते. असो, मंदाना आणि रोशेलचे भांडण \'बिग बॉस\'च्या घरात सामान्य झाले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 20व्या दिवशीची खास झलक...