आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने घेतली स्पर्धकांची शाळा, विकास भल्ला झाला ELIMINATE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकास भल्ला आणि सलमान खान
मुंबई- वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस डबल ट्रबल'मधून रविवारी (1 नोव्हेंबर) अभिनेता आणि गायक विकाल भल्ला एलिमिनेशन झाला आहे. शनिवारीच्या (31 ऑक्टोबर) एपिसोडमध्ये होस्ट सलमान खानने अरविंद वेगडाच्या एव्हिक्शननंतर घोषणा केली होती, की या आठवड्यात आणखी एक मदस्य घरातून बाहेर जाणार आहे.
घरात आता 10 सदस्य (दिगंगना सूर्यवंशी, सुयश राय, किश्वर मर्चेंट, किथ सेक्वेअरा, रोशेल मारिया राव, अमन वर्मा, युविका चौधरी, प्रिन्स नरूला, मंदाना करिमी आणि रिमी सेन) राहिले आहेत. मात्र रविवारच्या एपिसोडमध्ये एक संकेत देण्यात आला, की बिग बॉसचा हा आठवडा वाइल्ड कार्ड एंट्रीच्या नावे असेल. टीव्ही अभिनेता ऋषभ सिन्हा पहिला वाइल्ड कार्ड स्पर्धक असणार आहे.
रिमी म्हणाली, 'मी जिंकवणे प्रेक्षकांची चूक'
सलमानने रविवारी सर्व सदस्यांना एक टास्क दिला, त्यामध्ये त्यांना विजेता होण्यासाठी भाषण द्यायचे होते. यादरम्यान सर्वजण प्रेक्षकांचे आभार मानत होते. मात्र रिमी सेनने सांगितले, की तिला जिंकवणे प्रेक्षकांची सर्वात चूक आहे. रिमी म्हणाली, 'प्रेक्षकांनी मला जिंकवले, कारण त्यांना मी समजलेच नाहीये. मी काय मांगतेय हेसुध्दा त्यांना समजत नाहीये. कदाचित ते आपले डोके बाजूला ठेऊन हा शो पाहत आहेत. त्यामुळे हा चुकीचा निर्णय ते घेताय आणि चुकून ही ट्रॉफी माझ्या हातात आली.'
सलमानने घेतली स्पर्धकांनी शाळा-
सलमान खानने रविवारी स्पर्धकांची शाळा घेतली. सलमानच्या म्हणणे होते, की ते प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरत आहेत. तसेच टास्कसुध्दा व्यवस्थित करत नाहीये. इतकेच नव्हे तर सलमानने त्यांना काही प्रेक्षकांच्या फेसबुकवरील पोस्टसुध्दा दाखवल्या. या पोस्टमध्ये स्पष्ट होत होते, की दोन-तीन स्पर्धक सोडून इतरांना बिग बॉसचे गेम समजत नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोंमधून पाहा 21व्या दिवशीची झलक...