आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BB9: हाउसमेट्स बनली लहान मुले, कुणी घातले डायपर तर कुणी केली KISSची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोशेल मारिया राव, उजवीकडे प्रिन्स नरूला आणि दिगंगना सूर्यवंशी (वरती), किश्वर मर्चेंट आणि सुयश राय
मुंबई. 'बिग बॉस'चा प्रत्येक आठवड्याचा पहिला दिवस नॉमिनेशन असतो. यावेळीसुध्दा असेल झाले. मात्र या वीकेंडमध्ये नॉमिनेशनचा नवीन टि्वस्ट पाहण्यात आला. 'बिग बॉस'ने या आठवड्यात लग्झरी बजेट टास्क आणि नॉमिनेशनला एकत्र जोडले. स्पर्धकांना लग्झरी बजेट टास्क 'शरारती बच्चे' देण्यात आला, हा टास्क या आठवड्यातील नॉमिनेशन ठरवणार आहे.
टास्कसाठी संपूर्ण घराला 'बीबी डे केअर स्कूल'मध्ये रुपांतरित करण्यात आले. त्यामध्ये ऋषभ सिन्हा, किश्वर मर्चेंट, रोशेल मारिया राव आणि प्रिन्स नरूला लहान मुलांच्या भूमिकेत दिसत आहेत, अमन वर्मा, सुयश राय, दिगंगना सूर्यवंशी आणि मंदाना करिमी यांचा शिक्षिकेची भूमिका सोपवण्यात आली. रिमी सेनला टास्कची संचालकच्या रुपात निवडण्यात आले. टास्कदरम्यान लहान मुलांची भूमिका करत असलेले स्पर्धक शिक्षकाची भूमिका करत असलेल्या स्पर्धकांना हरवण्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारू शकतात आणि शिक्षकांना त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करावी लागेल. टास्कचा निकाल मंगळवारी (17 नोव्हेंबर)च्या एपिसोडमध्ये देण्यात येईल.
कुणी घातले डायपर तर कुणी बॉटलने प्यायले दुध
टास्कदरम्यान सर्व स्पर्धकांनी धमाल-मस्ती केली. यादरम्यान लहान मुलांच्या रुपात दिसणा-या स्पर्धकांनी शिक्षकाच्या रुपात असलेल्या स्पर्धकांना त्रास दिला. शिक्षकांनी मुलांना डायपर घालण्यापासून जेवू घालण्यापर्यंत सर्व कामे केली. सुयश रायने लहान मुल बनलेल्या गर्लफ्रेंड किश्वर मर्चेंटला बॉटलने दुध दिले. तसेच ऋषभ सिन्हाने शिक्षिका झालेल्या मंदाना करिमीला KISS करण्याची मागणी केली. मात्र त्याची मागणी पूर्ण झाली नाही.
रिमी नाही अॅक्टिव्ह मंदानाने सोडला टास्क-
'शरारती बच्चे' टास्क सुरु झाल्यानंतर दोन स्पर्धकांनी पहल्यांच दिवशी हा टास्क सोडून दिला. एकीकडे रिमी सेनने टास्क करण्यास नकार दिला तर दुसरीकडे मंदानाने अर्ध्यातच टास्क सोडला. कॅप्टन सुयशने रिमीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याचे एक ऐकले नाही. अखेर सुयशने शिक्षा म्हणून तिचे मेट्रेस काढून टाकले. मंदानाविषयी बोलायचे झाले तर तब्येत ठिक नसल्याचे कारण सांगून तिने टास्कमधून काढता पाय घेतला. अमन वर्मा आणि रोशेल मारिया रावने तिला टास्कसाठी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 36व्या दिवशीची खास झलक...