आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोशलला झोपायचे आहे बॉयफ्रेंडच्या शेजारी, कपलमध्ये व्हिलन ठरली Drama Queen मंदाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोशेल मारिया रावसोबत सेकुएरा, खाली (डावीकडे) - मंदाना करिमी - Divya Marathi
रोशेल मारिया रावसोबत सेकुएरा, खाली (डावीकडे) - मंदाना करिमी

एन्टरटेन्मेंट डेस्कः 'बिग बॉस'च्या घरात चौथ्या दिवशी वाद- भांडण आणि ड्रामा बघायला मिळाला. सुरुवातीला बोलुयात लव्ह बर्ड्स रोशल मारिया राव आणि कीथ सेकुएरा यांच्याविषयी... रोशलला तिच्या बॉयफ्रेंडच्या शेजारच्या बेडवर झोपायचे होते. मात्र कीथची जोडीदार मंदानाने यासाठी तिला परवानगी दिली नाही. मंदानाने नकार दिल्यामुळे रोशल खूप रडली. तिला कीथजवळ अश्रू ढाळताना बघितले होते.
विकास-युविका ठरले कॅप्टेंसी टास्कचे विजेते
'बिग बॉस'ने घरातील सर्व सदस्यांना लग्झरी बजेटसाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात वाईट परफॉर्मरची निवड करायला सांगितली. सर्वांनी सामंजस्याने अमन वर्मा आणि किश्वर मर्चेनची बेस्ट परफॉर्मर तर सुयश राय आणि रिमी सेनची वर्स्ट परफॉर्मर म्हणून निवड केली. बेस्ट जोडीला कॅप्टेंसीच्या रेसमध्ये सहभागी होण्यास सांगितले गेले. परफॉर्मन्सनुसार दुस-या क्रमांकावर विकास भल्ला आणि युविका चौधरी राहिले. बिग बॉसने कॅप्टेंसी टाक्सअंतर्गत अमन-किश्वर आणि विकास-युविका यांच्यात एक स्पर्धा घेतली. त्यामध्ये विकास आणि युविका विनर ठरले. अर्थातच विकास आणि युविका बिग बॉस 9 ची पहिली कॅप्टन जोडी आहे.
सुयशला सतावतेय गर्लफ्रेंडची काळजी
सुयश राय आपल्या गर्लफ्रेंडविषयी काळजी करताना दिसला. त्याच्या मते, अमन आपली जोडीदार (अर्थातच सुयशची गर्लफ्रेंड) किश्वरला त्रास देतोय. यावेळी सुयशने रिमीला सांगितले, की किश्वरसोबत जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवता यावा, यासाठी तो या शोमध्ये सहभागी झाला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, चौथ्या दिवसाची झलक फोटोजमध्ये...