आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BB9@Day:9 'लगान' टास्कमध्ये किश्वर-अमन बनले जमीनदार, बेशुध्द झाली युविका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरती किथ सेकुएरा आणि मंदाना करीमी (खाली), युविका चौधरी, अमन वर्मा आणि किश्वर मर्चेंट)
मुंबई- रिअॅलिटी शो 'बिग बॉस 9'च्या नवव्या दिवशी भांडण आणि रडारडी झाली. एकिकडे किथ-मंदानामध्ये मतभेद निर्माण झाले तर दुसरीकडे युविका बेशुध्द झाली. नवव्या दिवशी घरातील सदस्य उठले तेव्हा 'लगान' सिनेमातील गाणे वाजवले. घरातील टास्कची थीमसुध्दा 'लगान'च होती.
किश्वर-अमन झाले जमीनदार-
'लगान' टास्कमध्ये किश्वर आणि अमनला जमीदार बनवले होते, तसेच अरविंग सुपरवाइझर होता. अमन-किश्वरसमोर 'बिग बॉस'ने अट ठेवली, की जोड्यांच्या विरोधात काम करावे लागणार आहे. टास्कमध्ये अमन-किश्वरला सोडून इतर जोड्या मजदूर होतील. सर्व कामगारांना जमीनदारला पिठ विकायचे होते आणि शिक्के मिळवायचे होते. जी टीम सर्वात जास्त शिक्के जमा करेल ती विजेती. उन्हामुळे युविका 'लगान' टास्क करण्यात अपयशी ठरली आणि ती बेशुध्द पडली.
किथने मंदानावर लावले मनमानी केल्याचा आरोप-
किथ आणि मंदाना यांच्यात घरातील सदस्यासमोर वाद झाला. किथने मंदानावर मनमानी केल्याचे आरोप लावले. किथ असेही म्हणाला, की रोशेल जेव्हा त्याला ओढते तेव्हा मंदानाला वाटते की मी तिचा पाळीव कुत्रा आहे. तसेच रोशेल आणि विकास यांच्यातसुध्दा असाच नजारा पाहायला मिळाला. रोशेल बॉयफ्रेंड किथला सांगताना दिसली, की तिलासुध्दा घरातील कॅप्टन होण्याची इच्छा आहे, परंतु रिमी सेन यात अडथळा निर्माण करतेय.
किश्वर आणि सुयशचे भांडण-
किश्वर आणि सुयशसुध्दा संध्याकाळी एकमेकांशी भांडताना दिसले. पहिल्यादा असेल झाले, की एका कपले भांडण झाले आहे. टास्कमध्ये जास्त शिक्के मिळवण्यासाठी सुयशने गर्लफ्रेंड आणि जमीदार झालेल्या किश्वरसोबत चालाकी केली. परंतु किश्वरला त्याचे षडयंत्र समजले. त्यात दोघांचे भांडण लटकले. या भांडणात तेल टाकण्याचे काम अमन वर्माने केले. त्याने सुयशला रागीट स्वभावाचा म्हटले. भांडणानंतर किश्वर आणि सुयश रडताना दिसले. त्यानंतर दोघांचे पॅचअप झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नवव्या दिवशीची खास झलक...