आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 9 Finale: Rochelle Maria Rao Out From BB9

#BiggBoss9 चा विजेता ठरला प्रिन्स नरुला, फिनालेसाठी आली कतरिना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजेत्याच्या ट्रॉफीसह प्रिन्स - Divya Marathi
विजेत्याच्या ट्रॉफीसह प्रिन्स
प्रिन्स नरुला याने अखेर बहुचर्चित रियालिटी शो 'बिग बॉस 9' जे विजेतेपद मिळवले आहे. वाइल्याड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत टक्कर दिली. पण पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेला प्रिन्सच अखेरच विजेता ठरला. विशेष म्हणजे प्रिन्सने यापूर्वी रोडीजसारखे रियालिटी शोदेखिल जिंकले आहेत.
कतरिनाची हजेरी...
सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ हिनेही अंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली. तिच्या फितूर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आदित्य रॉय कपूर बरोबर ती अंतिम सोहळ्यात आली होती. यावेळी आदित्य आणि कतरिना यांचा परफॉर्मन्सदेखिल झाला.
कोण होते फायनल स्पर्धक...
- प्रिन्स नरूला एक मॉडेल आहे. तो MTVच्या 'रोडीज X2' शोचा आणि 'स्प्लिट्स विला 8'चा विजेता आहे.
- तेहरानमध्ये लहानाची मोठी झालेली मंदाना करिमीने मागील वर्षी 'भाग जॉनी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलीकडेच तिचा 'क्या कुल है हम 3' रिलीज झाला.
- ऋषभ सिन्हा टीव्ही अभिनेता आहे. त्याने 'कबूल है'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. त्याची या शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक एंट्री झाली होती.
- रोशेल मारिया राव 2012मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल राहिली आहे. आयपीएलच्या 6व्या सीझनमध्ये तिने एक्स्ट्रा इनिंग्स होस्ट केले होते.
या कलाकारांनी केले परफॉर्म
'बिग बॉस'चा हा फिनाले खास ठरला. 'कॉमेडी नाइट्स बचाओ'मधील भारती सिंह आणि कृष्णा अभिषेकनेसुध्दा परफॉर्म केले. छोट्या पडद्यावरील 'नागिन' फेम मौनी रॉय, बालकलाकार सिध्दार्थ निगम यांनीही परफॉर्मन्स देणार आहेत. किथ सेक्वेअरा आणि रोशेल राव यांचासुध्दा सिझलिंग परफॉर्मेन्स झाला. शोचा होस्ट सलमान खानने मौनीबरोबर परफॉर्म केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस 9'च्या फिनालेचे काही PHOTOS...
नोट- फोटो कलर्सच्या टि्वटर अकाऊंटवरून घेण्यात आले आहेत.