आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'करन-अर्जुन\' पुन्हा दिसणार एकत्र, शाहरुख-सलमानने शूट केला \'Bigg Boss\'चा प्रोमो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान आणि सलमान खान (1) मेहबूब स्टुडिओच्या बाहेर (2) क्रोमामध्ये शूटिंग करताना (3) स्टुडिओबाहेर गळाभेट घेताना शाहरुख-सलमान - Divya Marathi
शाहरुख खान आणि सलमान खान (1) मेहबूब स्टुडिओच्या बाहेर (2) क्रोमामध्ये शूटिंग करताना (3) स्टुडिओबाहेर गळाभेट घेताना शाहरुख-सलमान
मुंबई- सलमान खान आणि शाहरुख खान यांनी नुकताच \'बिग बॉस डबल ट्रबल\'चा प्रोमो एपिसोड \'करन-अर्जुन\'च्या अंदाजात शूट केला. दोघांनी एकाच स्क्रिनवर पाहणे एखाद्या व्हिज्युअल ट्रिटपेक्षा कमी नाहीये. मंगळवारी (8 डिसेंबर) दुपारी 4 वाजता मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये शाहरुख-सलमान यांनी गळाभेटसुध्दा घेतली आणि 5 तास एकत्र क्वालिटी टाइम घालवला. यादरम्यान \'दिलवाले\'चा दिग्दर्शक रोहित शेट्टीसुध्दा येथे उपस्थित होता. 
 
सूत्रांच्या सांगण्यानुसार, \'सलमान आणि शाहरुख 4 वाजता स्टुडिओमध्ये पोहोचले आणि गळाभेट घेऊन एकमेकांचे स्वागत केले. बिग बॉसच्या प्रॉडक्शन टीमने \'करन-अर्जुन\' थीमला रि-क्रिएट केले. दोन्ही स्टार्समध्ये काही खास सीन्स चित्रीत करण्यात आले. नंतर दोघांनी कॉफी घेऊन गप्पा मारल्या.\'
 
एका दुस-या सूत्राच्या सांगण्यानुसार, \'सलमानच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दोघांनी अर्धा तास बातचीत केली. सलमानने शाहरुखला बीइंग ह्यूमन टी-शर्ट गिफ्ट केला आणि शाहरुखने तो लगेच घातला.\'
 
सलमान यावेळी \'दिलवाले\'चा ट्रेलरसुध्दा पाहणार होता. परंतु असे होऊ शकले नाही. कारण त्याला आईचा (सलमा खान) बर्थडे सेलिब्रेट करायला जायचे होते. रात्री 9 वाजता दोघे मेहबूब स्टुडिओमधून बाहेर पडले. 
 
लवकरच एसआरके, सलमानच्या \'बिग बॉस\' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. हा एपिसोड या आठवड्यात प्रसारित होणार आहे. शाहरुख शोमध्ये 18 डिसेंबरला रिलीज होणारा \'दिलवाले\' सिनेमा प्रमोटसाठी कण्यासाठी येणार आहे.  
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सलमान-शाहरुखच्या या शूटिंगचे काही फोटो... 
 
बातम्या आणखी आहेत...