आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 9: बॉयफ्रेंड सुयशपेक्षा सात वर्षांनी मोठी किश्वर, पाहा रोमँटिक कपलचे Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'डबल ट्रबल' या थीमसोबत 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. एकुण 14 सेलिब्रिटी स्पर्धक शोमध्ये दाखल झाले आहेत. या 14 जणांमध्ये वन ऑफ द बेस्ट कपल सुयश राय आणि किश्वर मर्चंट आहे. रिअल लाइफमधील ही जोडी बिग बॉसच्या घरात गेम खेळताना दिसत आहे. सुयश आणि किश्वरची घरात मात्र एकत्र जोडी नाहीये. सुयशची जोडी रिमी सेनसोबत तर किश्वरची जोडी अमन वर्मासोबत जमली आहे. सुयशने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते, की तो आणि किश्वर ख-या आयुष्यात अगदी मनमोकळेपणाने एकत्र राहतात. दोघांचे विचारही मॉर्डन आहेत.
खास गोष्ट म्हणजे, किश्वर सुयशपेक्षा वयाने तब्बल सात वर्षे मोठी आहे. प्यार की ये एक कहानी या मालिकेच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते. बिग बॉस हा शो संपल्यानंतर लग्नगाठीत अडकणार असल्याचे दोघांनी जाहिर केले आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना 'सुकिश' हे नाव दिले आहे.
सुयशने सांगितले, बिग बॉसच्या घरात लागलेल्या भरपूर कॅमे-यांमुळे आम्हाला सतत एकत्र राहणे शक्य होणार नाहीये. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही आमच्या नात्याविषयी उघडपणे बोललो आहोत. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान आम्ही खासगी आयुष्यात जसे राहतो, वागतो, तसेच आम्ही शोमध्ये राहणार आहोत. आम्हाला बिग बॉसची आदर्श जोडी बनण्याची इच्छा आहे.
पुढील स्लाईड्मध्ये जाणून घ्या, किश्वर आणि सुयशविषयीच्या आणखी काही खास गोष्टी आणि सोबतच पाहा दोघांचे रोमँटिक क्षण...
बातम्या आणखी आहेत...