आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 9: कृतीनंतर रणवीरनेसुध्दा सलमानला करून दिली ऐश्वर्याची आठवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीकेंड स्पेशल एपिसोडदरम्यान सलमान खान आणि रणवीर सिंह - Divya Marathi
वीकेंड स्पेशल एपिसोडदरम्यान सलमान खान आणि रणवीर सिंह
मुंबई- मागील काही दिवसांत सलमान खानला त्याचे सहकारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायची आठवण करून देत आहेत. रविवारी (6 डिसेंबर) 'बिग बॉस 9'मध्ये असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले.
रणवीर सिंह 'बिग बॉस'मध्ये 'बाजीराव मस्तानी' सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला होता. यादरम्यान त्याने सलमान आणि ऐश्वर्याच्या 'हम दिल दे चुके सनम' सिनेमाचा उल्लेख केला. या सिनेमाच्या सेटवरून त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.
गायले 'तडप तडप के' गाणे-
रणवीरच्या सांगण्यानुसार, त्याला हा सिनेमा खूप आवडतो. विशेष म्हणजे या सिनेमातील 'तडप तडप के' गाणे त्याचे फेव्हरेट आहे. इतकेच नव्हे, रणवीरने हे गाणे गायलेसुध्दा. सलमाननेसुध्दा रणवीरच्या सुरात सुर मिसळून गाणे गायले.
सलमानसाठी कृती बनली होती ऐश्वर्या-
मागील आठवड्यात वरुण धवन आणि कृती सेनन 'दिलवाले' सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये आले होते. त्यावेळी कृतीनेसुध्दा 'हम दिल दे चुके सनम' सिनेमाचा उल्लेख केला होता. तसेच सिनेमात अॅश आणि सलमानवर चित्रित करण्यात आलेला पहिला सीनसुध्दा री-क्रिएट केला होता. या सीनसाठी कृती ऐश्वर्या बनली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, Bigg Boss अपडेट्स...
बातम्या आणखी आहेत...