आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Bigg Boss\'चे तीन आठवडे, वाचा काय म्हणताहेत एक्स विनर विंदू दारासिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः विंदू दारासिंग)
छोट्या पडद्यावरील बहुचर्चित 'बिग बॉस 8' हा शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. तीन आठवड्यात या शोमध्ये प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले आहेत. या शोच्या तिस-या पर्वाचे विजेते विंदू दारा सिंग यांना या शोच्या आठव्या पर्वाविषयी काय वाटते, त्यांचे स्पर्धकांविषयीचे काय मत आहे, हे divyamarathi.comने त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला विंदू दारासिंग यांचे या पर्वाविषयीचे मत त्यांच्याच शब्दांत सांगत आहोत..
काय म्हणाले विंदू दारासिंग वाचा...
''ज्या वेळी मी बिग बॉसचा पहिला शो टीव्हीवर पाहिला, तेव्हा मी माझ्या पत्नीला सांगितले होते, की हा शो माझ्या सारख्यांसाठीच आहे. ज्याही वेळेस मी या शोमध्ये सहभागी होईल, तेव्हा हा शो मी नक्की जिंकणारच हा विश्वास होता. सुदैवाने 2009 मध्येच मला ही संधी मिळाली. सीझन 3 मध्ये मी सहभागी झालो होतो, त्याचवेळेस मी शोचा आणि क्रूझ कारचा विनरसुद्धा ठरलो. तेव्हापासून हा शो माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या आय़ुष्याचा महत्वाचा भाग बनलाय. तुम्ही असेही म्हणू शकता, की या शोचं मला व्यसनच जडलंय. हा शो मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समजून घेण्यासाठी मोठा उपयोगी आहे आणि एक स्पर्धक म्हणून सांगू, तर हा शो तुम्हाला तुमची बलस्थानं आणि उणिवांची जाणीव करुन देतो. हा झाला शोचा गंभीर भाग. अगदी सहजपणे सांगायचे झाले तर हा शो म्हणजे एक वेगळीच मज्जा आहे. प्रेक्षकांना आनंद देणे, मित्र बनवणे आणि घरातील सगळ्याच गोष्टींवर हसवणारा हा शो आहे, मग त्या गोष्टी छोट्या असो वा मोठ्या.. बिग बॉस 3मधील अनेक जण आता माझे मित्र आहेत आणि आम्ही ब-याच वेळेस भेटतो सुद्धा...
2014 म्हणजे बिग बॉस 8 हा नवा सिझन आला.. हा शो टीव्ही जगतातील सर्वास जास्त उत्कंठावर्धक आणि मनोरंजन करणारा शो आहे. या शो मधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे नो डाऊट सुपरस्टार सलमान खान, जो मित्र पण आहे आणि शत्रूसुद्धा. या वर्षी 'किक'च्या मोठ्या यशानं तो आनंदी नक्कीच आहेच, मात्र एक दैत्य बनून तो गरीब स्पर्धकांचं रक्तसुद्धा पिणार यात शंका नाही. प्रत्येक वेळेस त्याच्या बोलण्यातून तो जणू एक नवं संकटच उभं करतोय.
नेहमी सारखेच विविध क्षेत्रातील स्पर्धक तर आहेतच, सोबतच या सीझनमध्ये सिक्रेट
सोसायटीच्या माध्यमातून मोठा ट्विस्टपण पाहायला मिळाला. स्पर्धकसुद्धा एका मोठ्या विमानात सोबत असल्याचं चित्र होतं. सिक्रेट सोसायटीने चांगलं काम केलं यात वाद नाही, मात्र तेही स्पर्धक आहेत आणि त्यांना याची किंमत मोजावी लागेल याचा त्यांना विसर पडला होता.
सीझन 8च्या पहिल्या आठवड्यात सोनाली राऊतला बाहेर पडावे लागले त्यावेळी ती कन्फ्युझ आणि गोंधळलेली दिसली आणि आम्हीसुद्धा तिला समजू शकलो नाही.. याच वेळेस सिक्रेट सोसायटी खालसा झाली आणि अडचणीच्या विमानातून सगळ्यांना बाहेर पडायची संधी मिळाली. सगळेच स्पर्धक बिग बॉसच्या आलीशान घरात दाखल झाले.. दिलेल्या कामगिरीमुळं मात्र करिश्मा तन्ना आणि गौतम गुलाटी यांच्यात कडाक्याचे भांडणसुद्धा पहावयास मिळाले आणि घरातील हा सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरला.. यासोबतच भाषेचा तोल सुटल्यानं गौतम गुलाटीला बिग बॉसने दिलेली शिक्षासुद्धा सगळ्यांनीच पाहिली.. खरंच एकही वाईट शब्द उच्चारल्याशिवाय तीन महिने एका जागेवर राहणे कठिणच आहे, माझा बाबतीतही शर्लिन चोप्राच्या बाबतील असाच किस्सा घडला होता त्याचे मला अजूनही दुःख आहे.
दुस-या आठवड्यातसुद्धा अनेक चढउतार पाहावयास मिळाले, यात एक महत्तवाचं मी सांगायला विसरलो, सोनाली परत आली आणि आम्हाला कळलं, की ती ब्युटी विथ ब्रेनचे कॉम्बिनेशन आहे. त्या आठवड्याच्या शेवटी सुकिर्ती खंडपाल हिला कमी मते मिळाल्याने घराबाहेर पडावे लागले, यामुळे उपेन पटेल दुःखी झाला का? आता तो सोनालीकडे वळला आणि बिचारी सुक्कू (सुकिर्ती) अनेकांसारखी विस्मृतीत गेली. तशीही सामान्य माणसांना या घरात तशी कमीच संधी मिळते. यात अजून एक महत्त्वाचं वाटलं, ते म्हणजे जे मित्र ख-या आयुष्यात एकमेकांना ओळखतात तेसुद्धा गैरसमजूती निर्माण करुन एकमेकांशी भांडतात. असो, उपेनची मैत्रीण सुकिर्ती अर्थातच ‘सुक्कू’ बिग बॉसमधून बेघर झाली. ज्यांचा लव्ह अँट फस्ट साइटवर विश्वास आहे, त्यांच्यासाठी उपेनने मारलेली पलटी नक्कीच धक्कादायक घटना होती.
असो शेवटी हा गेम आहे. पुढे जाऊया... या आठवड्यात घराची दोन भागांत विभागणी झालेली आपण बघितली. बब्बर आणि लाम्बा अशा दोन भागांत घराची विभागणी करण्यात आली होती. या खेळाचा उद्देश म्हणजे आर्य ‘लाम्बा’ आणि सोनाली ‘बब्बर’ यांचे लग्न हाच दिसतोय. बब्बर कुटुंबीयांचा विरोध असतानादेखील. या कामगिरीत लोक एकमेकांना धक्काबुक्की करतायेत, दुखवतायेत. तर आर्य मात्र या घरातील मुलीला परत आणण्यासाठी धडपडताना दिसला. बाथरुमची दारे तोडतानाचा प्रसंग खूपच गंमतीशीर होता. बिग बॉस आता सहनशील झालेले दिसत आहेत. कारण यापूर्वीच्या पर्वांत असे वागायची परवानगीच नसे. अखेर लाम्बा कुटुंबीयांच्या प्रयत्नाने लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
लग्नाचा हा विषय विकेण्ड का वार विथ सलमान च्या वेळेस पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी आर्यची प्रतिक्रिया गरज नसणारी अशी होती. या घरात जेव्हा विश्वासाला तडा जातो, तेव्हा या घरात अशाच प्रतिक्रिया उमटतात, कारण या घरात नेहमी सत्याचा विजय होतो. आम्ही आर्यला ओळखतो आणि अशाच अनेकांनाही ओळखतो. त्यामुळे अशा लोकांना माफ करावे आणि या घरात असे प्रसंग पुन्हा निर्माण होणार नाही, अशी सावधगिरी बाळगायला हवी. मात्र विश्वास ठेवा, चांगले अद्याप यायचे आहे. आम्ही पुनीत इस्सरच्या दोन बाजू पाहिल्या, ज्या हसून लोटपोट करणा-या होत्या. सलमान मोठ्याने हसत होता, आणि मीसुद्धा ते दृश्य ऑनलाइन दोनदा पाहिले. हा खरा शो आहे, सर्व दृश्ये प्रसारित होतील, असे पुनीतला कधीच वाटले नसावे. कारण या स्ट्राँग माणसाने याआधी असे काहीच अनुभवले नाहीये.
अखेर, तिस-या आठवड्यात दीपशिखाला घराबाहेर पडावे लागले. एका मोठ्या स्पर्धकाची शोमधील एक्झिट धक्कादायक होती. मात्र हे बिग बॉसचे घर आहे आणि कुणी थोडे जरी बिग बॉससारखे वागायचा प्रयत्न केल्यास, त्याच्यावर बेघर होण्याची वेळ येते. दीपशिखाच्या एलिमिनेशनमुळे स्पर्धकांना घरात काहीही घडू शकते यावर विश्वास बसला आहे. या तीन आठवड्यांच्या प्रवासात स्पर्धकांना शाहिद कपूर, श्रद्धा कपूर, मागील पर्वातील काम्या पंजाबी, अँडी, हृतिक रोशन, एव्हरग्रीन रेखाजी यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांची उपस्थिती स्पर्धकांना एनर्जी देणारी ठऱली.
एकंदरीतच, हे पर्व बघून मला आमच्या पर्वाची आठवण झाली. अनेक अडचणींना तोंड देत आम्ही हा प्रवास केला होता. आता केवळ नऊ आठवडे शिल्लक असून 63 दिवस प्रेक्षक अनेक इंट्रेस्टिंग टास्क, भांडण या घरात बघू शकणार आहेत.''