('बिग बॉस'च्या घरात मस्ती करताना हाऊसमेट्स)
मुंबईः 'बिग बॉस'चा दुसरा आठवडा संपतासंपता सर्व हाऊसमेट्स समोरासमोर आले आहेत. घरातील बदलत चाललेल्या परिस्थितींमध्ये गौतम-सोनालीचा रोमान्स सुरु झालाच होता, तोच सुकिर्तीने तमाशा उभा केला. मग काय एकामागून एक सर्वांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. त्यामुळे हा प्रवास पुढे आणखीनच रंजक होत जाणार असे दिसत आहे. गुरुवारच्या एपिसोडमध्ये रोमान्स, राग, गेम,
फ्रेंडशिप आणि भांडण सर्व काही पाहायला मिळाले. आमच्याकडून या एपिसोडला 4 स्टार...
सोनालीचे रँकिंग
पहिल्या दिवसापासूनच सोनाली अनेकांना आवडली नव्हती. बिग बॉसच्या आदेशानंतर रँकिंगने सोनालीला अनेकांच्या जवळ आणले, तर काही जणांपासून ती आणखीनच दुरावली. करिश्मा तन्ना आणि दीपशिखा सोनालीला मिळत असलेल्या सोयींमुळे रागावलेल्या आहेत. सोनालीचे पुनरागमन घरात रोमान्स आणि फाइटचा डबल डोज घेऊन झाले आहे.
सुकिर्ती आणि गौतममध्ये तू तू मैं मैं...
गौतम आणि सोनाली यांच्यात निर्माण झालेली जवळीक अनेकांना आवडलेली दिसत नाहीये. त्यांची मैत्री घरात गॉसिपिंगचा विषय ठरली आहे. किचनमध्ये गौतम-सोनाली यांच्या रोमान्सवर हसणे सुकिर्तीला भारी पडणार असे दिसत आहे. बोलण्या-बोलण्यात गौतम आणि सुकिर्ती यांच्यात वाद निर्माण झाला. बघता बघता आर्य बब्बर, दीपशिखा आणि प्रीतमसुद्धा या वादात सामील झाले. तर मिनिषा आर्यवर नाराज दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा Day 12ची निवडक छायाचित्रे...