आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: संभावनाने डिम्पीला फेकून मारला बूट, एजाजने आवळला अलीचा गळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डिम्पीच्या दिशेने संभावना सेठ बूट फेकताना)
मुंबई- 'बिग बॉस'च्या 106व्या आणि 'हल्लाबोल' सिरीजचा दुसरा आजिबात चांगला नव्हता. 'बिग बॉस'ने सकाळी-सकाळी घोषणा केली, की सदस्यांना गार्डन परिसरात लावलेल्या तंबूमध्ये राहायचे आहे आणि घरातील सर्व कामेसुध्दा त्यांनाच करायचे आहेत. 'बिग बॉस'च्या या निर्णयाने सना आणि एजाज थोडे नाराज दिसले. मात्र, नंतर सनाने बिग बॉसचा आदेश मानला. पण एजाजने नियमांनुसार चालण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच, नव्हे एजाजने घरातील कामात मदत करण्याससुध्दा नकार दिला. सर्वांनी एजाजला खूप समजावले, मात्र त्याने कुणाचे काहीच ऐकले नाही.
संभावनाने डिम्पीला बूट फेकून मारले-
'हल्लाबोल'च्या दुस-या दिवशी संभावना सेठने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. राहूल महाजनच्या म्हणण्यावर डिम्पीने कॅप्टन अलीला सांगितले, की चॅलेंजर्सना समजावू सांग, की प्रत्येकाने आपआपले काम वाटून घ्या. त्यामुळे कुणावर जास्त कामाला दबाव येणार नाही. संभावनाला डिम्पीने चॅलेंजर्समध्ये केलेले हस्तक्षेप आवडले नाही. तिने डिम्पीला सांगितले, की तिने चॅलेंजर्समध्ये हस्तक्षेप करू नये. यावेळी दोघींमध्ये वाद निर्माण झाला आणि संभावनाने रागातच्या भरात डिम्पीच्या दिशेने बूट फेकून मारले. त्यानंतर डिम्पी बाथरुममध्ये जाऊन खूप रडली. महक आणि प्रीतम यांनी तिला बाथरुममधून बाहेर काढून खूप समजावले. डिम्पीला वाईट वाटले, की तिने राहूलच्या म्हणण्यावरून ती चॅलेंजर्सना समजावण्यासाठी गेली होती आणि संभावनाने तिच्यासोबत असे गैरवर्तण केले तरी राहूल काहीच बोलला नाही. मात्र, प्रीतमच्या म्हणण्यावरून राहूलने संभावनाला समजावले. त्यानंतर संभावनाने डिम्पीची माफी मागितली.
'हल्लाबोल'चे पहिले नॉमिनेश-
'बिग बॉस'च्या घरात चॅलेंजर्सना नॉमिनेशनचा अधिकारसुध्दा दिला नाही. केवळ चॅम्पियन्सला वोटींगचा अधिकार देण्यात आला. सर्वात जास्त मत संभावना, एजाज आणि महक यांच्या खात्यात पडले. संभावनाला डिम्पीसोबतच्या गैरवर्तणूकीसाठी, एजाजला स्वत: म्हणणे धकवण्यासाठी आणि महकला मजबूत स्पर्धक असल्याने नॉमिनेट करण्यात आले.
एजाजने दाबला अलीचा गळा-
संध्याकाळी अलीने एजाजला चिडवण्यासाठी कमेन्ट करण्यास सुरुवात केली. परंतु मजाकमध्ये सुरु झालेला हा खेळ गांभीर्याकडे वळाला. एजाजने अली अलीच्या कमेन्ट्स मनावर घेतले आणि तो अलीला मारायला धावला. प्रीतमने त्याला मध्यस्ती करून त्याला अडवले. अलीने एजाजला सांगितले दिले, की तो काहीही बोलू शकतो मात्र हिंसक पाऊल उचलू शकत नाही. वाद चालू असताना एजाज अलीवर धावून आला. दोघांनी एकमेकांवर हात उचलला. एवढेच नव्हे, एजाजने अलीचा गळा दाबला, त्यानंतर अलीला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. घरातील सदस्यांनी एजाजला पकडून दूर नेले आणि अलीला घरात 'बिग बॉस'ने कंफेक्शन रुममध्ये बोलावले.
एजाजच्या विरोधात गेले घरातील सदस्य-
अलीवर एजाजने केलेल्या हल्ल्यानंतर सर्व सदस्य एजाजच्या विरोधात गेले. केवळ संभावना एजाजच्या बाजूने उभी होती. संभावना एजाजला म्हणाली, कुणी असो वा नसो ती नेहमी त्याच्यासोबत आहे. मात्र, इतर सदस्यांनी सांगितले, की ते एजाजला पसंत करताना, मात्र हिंसेसाठी ते त्याची साथ देऊ शकणार नाहीत. एजाजने आरोप लावला, की प्रीतम आणि अली 15 वर्षांपासून त्याचे मित्र आहेत आणि ते हे सर्व नाटक त्याला घराबाहेक काढण्यासाठी करत आहेत. बातमी आहे, की एजाजच्या गैरवर्तणूकी मुळे 'बिग बॉस'ने त्याला घराबाहेर काढले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या घरातील 106व्या दिवशीची छायाचित्रे...