आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss Analysis : 20व्या दिवशी झाला अनेक रहस्यांचा उलगडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(\'बिग बॉस 8\'दरम्यान सलमान खान)
 
\'बिग बॉस 8\'च्या 20व्या दिवशीची सुरुवात सलमान खानच्या क्लासने झाली. त्यामध्ये मागील दिवसांत स्पर्धकांमध्ये झालेल्या टास्कदरम्यान हाथापाईची झलक प्रेक्षकांना दाखवली. त्यानंतर स्पर्धकांची मजा घेण्यास सुरुवात झाली. सलमान सर्वात पहिल सलमानने प्रणितला गायब झालेल्या दाढी आणि मिशांविषयी विचारले. प्रणितने सांगितले, एविक्ट होण्यापासून वाचलो तर दाढी काढेल असा शब्द मी स्वत:ला दिला होता. तो मी पूर्ण केल्याने मी असे केले. त्यानंतर लगेच, सलमान फिमेल स्पर्धकांची प्रशंसा करताना दिसला. त्यामध्ये दीपशिखाने सलमानकडे, तिचा करवा चौथचा उपवासाच्या दिवशी पती केशवला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
        
सोनाली आणि उपेनची केमिस्ट्री
मागील दिवसांत टास्कदरम्यान कपल म्हणून वावरणारे सोनाली आणि उपेन यांच्यात शनिवारी (11 ऑक्टोबर)  चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. सलमानने सोनालीला विचारले, की हसबँड मटेरिअल कोण आहे? सोनालीने उपेनकडे बोट करून त्याला हसबँड मटेरिअल असल्याचे सांगितले. त्यानंतर सलमानने सोनाली आणि उपेनला डान्स करण्यास सांगितले. दोघांनी \'बँग बँग\'च्या टायटल साँगवर डान्स केला.
 
सलमानला मिळाला हृतिकचा मॅसेज
अलीकडेच, हृतिक रोशन \'बिग बॉस\'च्या घरात आला होता. त्याने स्पर्धकांचे बरेच मनोरंजन केले. परंतु तो सलमानसाठी एक मॅसेज सोडून गेला. शनिवारी (11 ऑक्टोबर) हृतिकचा हा मॅसेज सलमानला मिळाला. हृतिकने मॅसेजमध्ये सांगितले होते, की त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा तो मदतीसाठी एका व्यक्तीकडे गेला होता. त्याचे नाव सलमान खान आहे. हृतिकने त्याला बॉडी बिल्डींग शिकवण्यास सांगितली होती. त्यावेळी सलमानने त्याला आपल्या जिमची चावी दिली होती. सलमान त्याला रात्री दोन वाजता जिममध्ये वर्कआऊटसाठी बोलवत होता. हृतिकने या मॅसेजमध्ये सलमानला आपला मोठा भाऊ म्हणून संबोधले. त्यानंतर म्हणाला, बीइंग ह्यूमन आणि ह्यूमन बीइंगमध्ये फरक पाहायचा असेल, तर सलमानला भेटा.
 
आर्यने उलगडले मिनिषाचे रहस्य
प्रत्येक वीकेंडमध्ये सलमान एका स्पर्धकाशी कन्फेशन रुममध्ये बातचीत करतो. यावेळी त्याने आर्य बब्बरशी संवाद साधला. आर्यने सर्वात पहिले करिश्मा आणि गौतम यांच्या भांडणावर मत व्यक्त केले. परंतु सलमाने त्याला समजावले, की तो मोठा भाऊ किंवा प्रोटेक्टर करण्याचा का प्रयत्न करत आहे. त्याने हा गेम एन्जॉय करावा. अलीकडेच, मिनिषा आर्यविषयी म्हणाली होती, की \'बिग बॉस\'मध्ये येण्यापूर्वी तो तिला फोन करून म्हणाला होता आपण फेक रोमान्स करून प्रसिध्दी मिळवू. त्यामुळे ती फायनलपर्यंत पोहोचू शकते. शनिवारी कन्फेशन रुममध्ये सलमानशी बातचीतदरम्यान तिच्या बॉयफ्रेंडला वाईट तर नाही ना वाटले? असे विचारल्यानंतर मिनिषाने नकार देऊन सर्व बातचीत तिथेच संपुष्टात आणली.
 
डेंजर स्थानावर आर्य बब्बर
सलमानने घरातून नॉमिनेट झालेल्या सर्व सदस्यांविषयी विचारले, की कोण सर्वाधिक निशाण्यावर आहे. सर्वात जास्त मत आर्यच्या खात्यात पडले. त्याला डेंजर स्थानावर बसवण्यात आले.
 
मिनिषाने साधला आर्यवर निशाणा आणि आर्यने सांगितले तिला आपली एक्स-गर्लफ्रेंड
मिनिषाने सलमानला सांगितले, की शोमध्ये येण्यापूर्वी आर्य तिच्यासोबत गेमची स्ट्रॅटेजी शेअर करत होता. मिनिषानुसार, आर्यने तिला सांगितले होते, \'मला माहित आहे, तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे. माझ्याही आयुष्यात एक व्यक्ती आहे. परंतु फक्त गेममध्ये जर तुझी इच्छा असेल तर आपण जवळीक वाढवू शकतो. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्या बॉयफ्रेंडशी बोलतो. त्याला सांगेल हा केवळ एक गेम आहे. मी आर्यला समजावले, की मी गेममध्ये येतेय, मात्र असे काही करणार नाहीये. माझे आयुष्य वेगळे आहे. त्यानंतर तो म्हणाला ठिक आहे. तू विचार कर याविषयी. मी त्याला म्हणाले आर्य मी असे काहीच करणार नाहीये आणि विचारही करणार नाहीये. तो मला म्हणाला अलिंगन देणे किंवा हात पकडणे ठिक आहे. मी त्याला स्पष्ट सांगितले असे काहीच होणार नाहीये.\'                 
    
मिनिषाचे स्पष्टीकरण ऐकून आर्यने सलमानला सांगितले की त्याचा एक मित्र आहे, त्याला मिनिषा \'बिग बॉस\'च्या घरात येणार असल्याच्या बातम्यांनी असुरक्षित वाटत होते. कारण मिनिषा त्याची पहिली गर्लफ्रेंड होती. आर्यच्या सांगण्यानुसार, त्याला माहित नव्हते, की मिनिषा बिग बॉसमध्ये येत आहे. आर्यने असेही सांगितले, की मिनिषाने त्याला सर्वात पहिले मॅसेज केला होता.
 
आर्यचा अकडूपणा
मिनिषा आणि आर्यचे ऐकून सलमानने आर्यला सांगितले, की त्याने डेंजर झोनमधून उठून इतर कुणाला त्या ठिकाणी बसवावे. आर्यने अकडूपणा दाखवत त्यासाठी नकार दिला. यावेळी आर्यने सलमानला सांगितले, की त्याला शोमध्ये जेवढे वाईट दाखवण्यात येत आहे, तेवढा तो नाहीये. त्यानंतर सलमानने त्याला सुरक्षित असल्याचे सांगितले. आर्यने प्रीतमला डेंजर झोनमध्ये बसवले.