आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss Analysis: आर्यने मागितली माफी, नॉमिनेशनमध्ये आला टि्वस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मिनिषा लांबा)
मुंबई: अलीकडेच, दीपशिखाचे एलिमिनेशन झाल्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात रुसलेल्यांना समजावण्याचा प्रकार सुरु झाला. सोमवारी (13 ऑक्टोबर)च्या एपिसोडमध्ये आर्य पुनीतच्या सल्ल्यासोबत दिसला. पुनीतने आर्यला सांगितले, त्याच्या आणि मिनिषामध्ये जो वाद झाला त्याला शांततेत सोडवावे. आर्यने मिनिषाची चांगली संधी पाहून माफी मागावी असेही पुनीतने त्याला सांगितले. सोबतच, पुनीतने आर्यला बिग बॉसची माफी मागायची सांगितली. कारण त्याने रागाच्या भरात त्याने माइक स्विमिंग पुलात फेकून दिला होता.
दुसरीकडे, एकमेकांचे कान भरवण्याचे काम सुरु
किकडे पुनीत आणि प्रणित आर्य आणि मिनिषा यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न सुरु झालेला दिसला. तसेच, काही स्पर्धक त्यांच्या कमतरता काढताना दिसले. विशेषत: गौतम, जो मागील आठवड्यांपर्यंत सोनालीच्या खूप चांगला मित्र होतो. तो उपेनला म्हणाला घरातील दोन लोक अर्थातच सोनाली आणि मिनिषा अजिबात काम करत नाहीये. त्यांना काम द्यायला हवे. उपेन एका टास्कदरम्यान सोनालीच्या खूप जवळ आला होता. त्यामुळे उपेनने गौतमचे म्हणणे लगचे सोनालीला जाऊन सांगितले. एकूणच उपेन सोनाली समोर गौमतपेक्षा मी तुझा चांगला मित्र आहे असे सिध्द करतोय.
सुरुवातीला गौतम, नंतर उपेन आणि आता आर्य
आम्ही सांगत आहोत सोनालीविषयी. ती मागील आठवड्यात गौतमशी जवळीक वाढवत होती. या आठवड्यात ती उपेनसोबत आहे. आता त्याला सर्वात रंजक वळण आले आहे, की ती आर्यशी जवळीक वाढवताना दिसू शकते. सोमवारी असेच काही घरात दिसले. आर्य सोनालीची मागील काही चुकांसाठी माफी मागत होता. तेव्हा सोनालीने आर्यला सांगातिले, की बाहेर तिची प्रतिमा चांगला होती, परंतु 'बिग बॉस'च्या घरात आर्यची प्रतिमा पाहून तिच्या चेह-यावर एक प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले. यादरम्यान आर्यने केवळ सोनालीला बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर राहण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसले.
प्रीतमची प्रेमकथा
22व्या दिवशी प्रीतमने आर्यला आपली प्रेमकथा सांगितली. तो म्हणाला, की सुरुवातीला तो आशिक टाइप मुलगा होता. नागपूरच्या एका कॉलनीत तो राहत होता, त्याच कॉलनीत अनेक सुंदर मुली राहत होत्या. ट्यूशनमधून तिला काढून टाकण्यात आले होते. तो नेहमीच मुलींना प्राभावित करत होता. एक मुलगी पटलीदेखील, मात्र दोन वर्षांत त्यांचे ब्रेक-अप झाले.
नॉमिनेशनमध्ये टि्वस्ट
'बिग बॉस'ने नॉमिनेशनची प्रक्रियेत यावेळी मोठा बदल करण्यात आला होता. यावेळी त्यांनी स्पर्धकांना सुरक्षित सदस्याचे नाव विचारले. 'बिग बॉस'च्या माइकला नुकसान पोहोचल्यामुळे आर्यकडून त्याचा व्होटींगचा अधिकार काढून घेतला. सुरक्षित करण्यासाठी स्पर्धकांनी खालीलप्रमाणे नाव घेतले-
मिनिषा : नताशा
पुनीत : प्रणित
करिश्मा : सुशांत
प्रणित : पुनीत
उपेन : सोनी
डिआंड्रा : उपेन
प्रीतम : सुशांत
सोनी : उपेन
नताशा : सुशांत
सुशांत : उपेन
गौतम : प्रणित
सोनाली : प्रणित
या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी आर्य, मिनिषा, डिआंड्रा, करिश्मा, पुनीत, नताशा, प्रीतम, गौतम, सोनी यांचे नाव नॉमिनेट झाले आहेत. कदाचित हे पहिली अशी वेळ आहे, की घरातील 9 सदस्यांचे नाव नॉमिनेट झाले आहेत.
करिश्माचे दोन अँटी स्पर्धक आले जवळ
गौतम आणि मिनिषा या दोघांचेही करिश्माशी मतभेद वाढले आहेत. म्हटले जाते ना, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है. असेच चित्र घरात दिसून आले. गौतम आणि मिनिषा दोघे एकमेकांच्या जवळ आलेले दिसले. गौतम गार्डनमध्ये बसून करिश्माची खिल्ली उडवताना दिसला आणि मिनिषा त्याच्या विनोदांवर हसत होती. यादरम्यान मिनिषा गौतमला म्हणाली, की त्याने तिच्यासाठी एखादे गाणे तयार करावे.
घरातील सदस्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे
दोन दिवसांपूर्वी घरातील सदस्यांनी काही गुपित पत्र लिहिले होते. त्यामध्ये काही प्रश्न होते. त्या प्रश्नांचे उत्तर मागण्यात आले आणि या टास्कला नाव देण्यात आले, 'घरवाले जानना चाहते है'. त्यांनी प्रश्न विचारण्याचा अधिकार गौतमला दिला. सोबतच, एखाद्या स्पर्धकाने प्रश्नाचे उत्तर दिले नाही किंवा प्रश्नाला फिरवून दिशाभूल केली तर गौतम त्या सदस्यला आपल्या मनाप्रमाणे प्रश्न विचारू शकतो. या प्रश्न-उत्तरामध्ये आर्यने मिनिषाची माफीदेखील मागितली. यावेळी गौतमने डिआंड्राला विचारले, की ती त्याच्या गोष्टींना पर्सनली का घेते? डिआंड्राच्या सांगण्यानुसार, ती गौतमच्या मुर्खपणाच्या वागण्यामुळे असे करते. या टास्कदरम्यान प्रश्नांचे उत्तर मिळत होते, तसेच, स्पर्धकांमध्ये मतभेद निर्माण होत होते.
बाकी सर्वकाही ठिक आहे. प्रश्नांचे उत्तर देण्यात सर्वाधिक जी स्पर्धक अडकला, ती म्हणजे करिश्मा. तिला तिच्या राजनितीविषयी विचारण्यात आले आणि जाणून घेण्यात आले, की ती इतकी स्वार्थी का आहे? यावर करिश्माने सांगितले, ती स्वत:वर प्रेम करते. कदाचित त्यामुळेच ती स्वार्थी आहे. आतापर्यंत तिला जे तिच्या जवळचे वाटत होते, ते तिच्या विरोधात दिसले. पुनीतने सरळ शब्दात सांगितले, की तिच्या मनात स्वार्थभाव आहे. 'बिग बॉस'च्या प्रश्न-उत्तराच्या टास्कनंतर घरात हंगामा निर्माण होऊ शकतो, हे नक्की. हे तुम्ही येत्या एपिसोड्समध्ये पाहू शकता.