(पुनीत इस्सर)
मुंबई: '
बिग बॉस'च्या घरात 45व्या दिवसाची सुरुवात स्पर्धकांना दिलेल्या लग्जरी बजेट टास्क 'उंची है बिल्डिंग'ने झाली. या टास्कला मंगळवारी (4 नोव्हेंबर) पुनीत आणि आर्यमुळे थांबवण्यात आले होते. या टास्कदरम्यान आर्यने पुनीतवर हिंसेचा आरोप लावला होता. त्यामुळे पुनीतला घराबाहेर काढण्यात आले होते.
45व्या दिवशी अर्थातच बुधवारी (5 नोव्हेंबर) नव्याने टास्कची सुरुवात झाली. त्याअंतर्गत टीम ए (गौतम, सोनाली, सुशांत आणि प्रीतम)ला पहिली संधी मिळाली. मात्र दुस-या टीमचे सदस्य डिआंड्रा आणि अलीने टास्क बिघडवण्याचा प्रयत्नदेखील केला.
अखेर, टीम एचा टाइन संपला आणि वेळ आली ती टीम बीची. टीम बीमध्ये डिआंड्रा, करिश्मा, आर्य, प्रणित आणि अली होते. छोट्या-मोठ्या भांडणानंतर टास्क पूर्ण झाला आणि कॅप्टन उपेनने टीम बीला विजयी घोषित केले. मात्र, अद्याप 'बिग बॉस'चा निर्णय आलेला नाहीये.
आर्यवर सुशांत आणि प्रीतमने केला प्रश्न
टीम बी 'उंची है बिल्डींग' टास्क करत होती तेव्हा टीम एचे सदस्य विशेषत: पुनीतच्या पक्षातील लोकांनी आर्यवर प्रश्न उपस्थित केला. आर्यने पुनीतवर हिंसेचा आरोप लावला होता, त्यानंतर पुनीतला घरातून बाहेर काढण्यात आले. आर्यचे म्हणणे होते, की पुनीतने शारीरिक ताकदीता वापर केल्याने त्याच्या गळ्याला दुखापत झाली. मात्र दुस-या दिवशी सकाळी तो एकदम ठणठणीत दिसला. त्याच्या गळ्याला कोणतीही दुखापत दिसत नव्हती. मोठ्या उत्साहाने तो टास्क पूर्ण करण्यात व्यस्त होता. याविषयी प्रीतम आणि सुशांतने प्रश्न उपस्थित केला, की पुनीतला घराबाहेर काढण्यासाठी त्याने दुखापतीचे नाटत केले होते. त्याला खरंच दुखापत झाली होती तर तो आता इतक्या उत्साहाने टास्क कसा पूर्ण करतोय? असा प्रश्न उपस्थित झाला.
आता आर्यच्या गळ्याला दुखापत झाली होती, की त्याने पुनीतला बाहेर काढण्यासाठी असे नाटक केले. हे लवकरच सर्वांसमोर येईल.
पुनीतने मागितली माफी
पुनीतला आर्यवर शारीरिक ताकदीचा वापर केल्याच्या आरोपाखाली घराबाहेर काढण्यात आले. 45व्या दिवशी अर्थातच बुधवारी पुनीतने लिव्हिंग एरियामध्ये लावलेल्या एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून आर्यची माफी मागितली. पुनीतनुसार, त्याने टास्कदरम्यान आर्यवर मार्शल आर्ट मुव्हचा वापर केला होता. त्याने ते करायला नको होते. पुनीतने इतर सदस्यांची कळत नकळात केलेल्या गैरवर्तन केले असल्याबद्दलही माफी मागितली. पुनीत माफी मागताना थोडा भावूक झाला होता.
पुनीतचे पुनरागमन
पुनीतने घरात प्रवेश केला आहे. आता पुनीतच्या पुनरागमनाने घरातील सदस्यांची काय प्रतिक्रिया येतील हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या घरातील 45व्या दिवसाची छायाचित्रांच्या माध्यमातून व्य झलक