आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: घरात झाली दोन नवीन सदस्यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री, पाहा Day 47ची खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पुनीतसोबत डिंपी, उजवीकडे रेने धयानी)
मुंबईः 'बिग बॉस'चे घर भांडण आणि वादविवादांसाठी प्रसिद्ध आहे. 47व्या दिवसाची सुरुवात गौतम आणि करिश्माच्या तू तू मैं मैंने झाली. झाले असे, की गौतम पुनीतसाठी ओट्सची मागणी करत होता. यावरुन करिश्मा आणि त्याच्यात चांगलेच जुंपले. घराच्याबाहेर भेट मग तुला चांगलाच धडा शिकवते, अशा शब्दांत करिश्माने गौतमला धमकी दिली. करिश्माच्या या धमकीमुळे वैतागलेल्या गौतमने स्वतःला शांत केले आणि तो पुनीतकडे निघून गेला.
वाइल्ड कार्ड एन्ट्री...
शुक्रवारी बिग बॉसच्या घरात दोन नवीन सदस्यांचे आगमन झाले. पहिली सदस्य ही रोडीजची माजी स्पर्धक रेने धयानी आणि दुसरी स्पर्धक ही राहुल महाजनची पत्नी डिंपी गांगुली आहे. दोघींची एन्ट्री अॅक्शन आणि डान्सने परिपूर्ण ड्रामात झाली.

पहिल्याच दिवशी रेने P3G ग्रुपमध्ये...

रेने धयानी हिला घरातील एन्ट्रीच्या पहिल्याच दिवशी P3G ग्रुपमध्ये सामील झालेले बघायला मिळाले. ती पुनीत, प्रीतम आणि गौतमला अलीपासून सावध राहण्याचा सल्ला देताना दिसली. रेनेने या ग्रुपला सांगितले, की अली डबल गेम खेळतोय.
प्रीतमने अलीला दिली चेतावनी...
अलीने प्रीतमवर काही जोक्स तयार केले होते. त्यामुळे प्रीतम त्याच्यावर नाराज झाला होता. अखेर, प्रीतमने अलीला चेतावनी दिली, की त्याने नॉनसेन्स जोक्स बंद करावे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होती.
गौतम आणि प्रणीत यांच्यात वाद...
दिवसभर बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये वादविवाद बघायला मिळाला. रात्र झाली तरी तो ड्रामा बंद झाला नव्हता. P3G ग्रुपमधील दोन सदस्य अर्थातच प्रणीत आणि गौतम यांच्यात कुठल्यातरी गोष्टीवरुन वाद निर्माण झाला. अखेर पुनीतने दोघांना बोलावून घेतले आणि गळाभेट घेण्यास सांगितले. अशाप्रकारे प्रणीत आणि गौतम यांच्यात सर्वकाही आलबेल झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 47व्या दिवसाची खास झलक छायाचित्रांमध्ये...