आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: गौतमचे शर्टलेस होऊन घरभर फिरणे निगारला नापसंत, डिम्पीला कॅप्टन्सीचे वेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(निगार खान)
मुंबई: 'बिग बॉस'च्या घरात 52व्या दिवसाची सुरुवात एका सरप्राइजने झाली. हे सरप्राइज रेनेसाठी होते. बुधवारी (12 नोव्हेंबर) रेनेचा वाढदिवस होता आणि 'बिग बॉस'ने तिला सरप्राइज देऊन 'ओ छोटे तेरा बर्थडे' गाणे डेडीकेट केले. मनोरंजन आणि आनंदाने सुरु झालेल्या या दिवशी तणाव आणि भांडणदेखील पाहायला मिळाले.
निगारला नापंसत आहे गौतमचा शर्टलेस लूक
निगार खानने गौतमला सांगितले, की तिच्यासमोर शर्टलेस होऊन येत जाऊ नकोस. कारण तिला गौतमचा असा लूक आवडत नाही. मात्र गौतमने निगारला आपल्या शब्दात उत्तर दिले. तो म्हणाला, की त्याला जे वाटते तेच तो करतो. यावर उपेन आणि प्रीतमने गौतमला सपोर्ट केला. यावेळी निगार, गौतम, उपेन आणि प्रीतमसोबत भांडताना दिसली.
कॅप्टन्सीबद्दल गोंधळ
अद्याप 'बिग बॉस'च्या कॅप्टनच्या निवडीबद्दल काहीच घोषणा झालेली नाहीये. परंतु घरात विशेषत: p3G ग्रुपमध्ये हा मुद्दा पहिल्याच दिवशीपासून चालू होता. गौतमला कॅप्टन होण्याची गेल्या काही आठवड्यांपासून इच्छा आहे. तसेच, त्याचे सहकारी प्रीतम, प्रणित आणि पुनीत त्याच्या बाजूने नाहीये. गौतम त्यांच्या या वागण्याने थोडा नाराज आहे. पुनीतने गौतमला सल्ला दिला, की प्रीतमने कॅप्टन आणि त्याने उप-कॅप्टन व्हायला हवे. आता कॅप्टन्सीच्या या स्पर्धेत स्वत:ला कसा सिध्द करतो.
आर्य आणि गौतममध्ये वाद
नेहमीच एकमेकांच्या विरोधाच दिसणारे आर्य आणि गौतम 52व्या दिवशीसुध्दा भांडण करताना दिसले. गौतमला आर्यचा मग बाथरुममध्ये सापडला आणि त्याने तो लॉस प्रॉपर्टीमध्ये टाकला. यावर आर्यचा पारा चढला आणि त्याने गौतमला स्पष्ट सांगितले, की विना परवानगी कुणाच्या वस्तूला हात लावू नकोस.
प्रीतम बेस्ट बटलर (नोकर) डिम्पी बेस्ट गेस्ट (पाहूणी)
'बिग बॉस'च्या लग्जरी टास्क संपला आणि कॅप्टन डिआंड्राला विचारण्यात आले, की ज्यांनी टास्कमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला अशा दोन सदस्याची नावे सांग. डिआंड्राने, प्रीतमला बेस्ट बटलर आणि डिम्पीला बेस्ट गेस्ट म्हणून सांगितले.

'बिग बॉस'मध्ये रेनेला एक टास्क देण्यात आला. ज्यामध्ये हाऊसमेट्सना स्वत:विषयी सत्य सांगण्यात येणार होते. त्यावेळी रेनेने डिम्पीला सांगितले, की इतरांचा आधार घेण्याऐवजी तिने स्वत:च्या डोक्याचा वापर करावा. नंतर डिम्पीने याचे रेनेला स्पष्टीकरण मागितले. रेनेने सांगितले, की प्रीतम आणि प्रणित सुरक्षित कॅप्टन्सीसाठी तिचा वापर करत आहेत.
कॅप्टन्सीच्या स्पर्धेत डिम्पीसुध्दा-
एपिसोडच्या शेवटी डिम्पी, गौतम-प्रीतम आणि प्रणितसोबत गेमविषयी बोलताना दिसली. शिवाय गौतमला सांगितले, की P3G ग्रुपसमोर तिचे नाव कॅप्टन पदासाठी घ्यावे. त्यानंतर डिम्पी P3G ग्रुपसोबत बातचीत करताना दिसली. मात्र नंतर करिश्माची गँगकडे गेली आणि खुलासा केला, की प्रीतमने तिच्या कॅप्टन होण्यावर आक्षेप घेतला आहे. डिम्पीनुसार, प्रीतमचे म्हणणे आहे, की तिला करिश्माची टीमपेक्षा जास्त व्होट मिळणार नाही. डिम्पीला जाणवले, की तो दोन्ही ग्रुपचा वापर करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा छायाचित्रांतून 52व्या दिवशीची झलक...