आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: गौतमच्या गळ्यावर सोनालीच्या लिपस्टिकचा डाग, गालावरही केले Kiss

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लग्जरी बजेटच्या खरेदीसाठी घरातून निघालेले गौतम आणि सोनाली)
मुंबई- अखेर करिश्मा घरातील कॅप्टन झाली. शुक्रवारी (5 डिसेंबर) नवीन कॅप्टनसाठी निवडणूक झाली. 'बिग बॉस'ने प्रीतमला दोन सदस्यांची नावे कॅप्टन पदासाठी मागितली. यावेळी एक नाव घरातील सदस्यांना निवडायचे होते तर दुसरे प्रीतमला सांगायचे होते. घरातील सदस्यांनी करिश्माचे नाव सुचवले आणि प्रीतमने स्पेशल पावरचा वापर करून स्वत:चे नाव कॅप्टन पदासाठी दिले. प्रीतम असा निर्णय घेईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती.
कॅप्टन पदासाठी करिश्माची निवड-
'बिग बॉस'ने कॅप्टन पदाच्या दोन्ही उमेदवारांना एक टास्क दिली. या टास्कचे नाव 'टिक चॅक टो' होते. या टास्कदरम्यान दोघांना घरातील सदस्यांना पटवून द्यायचे होते, की त्यांना पाठिंबा देऊन कॅप्टन पदासाठी निवड करावी. करिश्माने गौतमला शब्द दिला, की ती कॅप्टन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पक्षपात करणार नाही. तसेच, प्रीतमने गौतमला पटवून सांगितले, की शनिवारी सलमानने त्याला अफेअर कॅप्टन म्हटले तर तो त्याच्या पाया पडेल. अखिर गौतमने करिश्माला साथ दिली.
अलीचे स्वपन् तुटले...
करिश्माने अलीला शब्द दिला होता, की जर ती कॅप्टन बनली तर अलीला उप-कॅप्टन बनवेल. परंतु कॅप्टन बनल्यानंतर करिश्माने असे केले नाही. कारण डिम्पीने याचा विरोध केला होता आणि करिश्माने अलीकडून ही संधी हिसकावून घेतली. करिश्माच्या या निर्णयाने अली दु:खी झाला.
लग्जरी बजेटची शॉपिंग करण्यासाठी घराबाहेर गेले गौतम-सोनाली-
'बिग बॉस'ने यावेळी लग्जरी बजेटसाठी दोन सदस्यांना घराबाहेर जाऊन मॉलमध्ये शॉपिंग करण्याची संधी दिली होती. 'बिग बॉस'ने गौतम आणि सोनालीला खरेदी करण्यासाठी पाठवले. मात्र, यावेळी त्यांना ग्राहकांकडून खरेदी करून घ्यायची होती. सोनाली आणि गौतम टास्कमध्ये यशस्वी ठरले आणि चाहत्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
सोनीलने गौतमच्या मानेवर सोडला लिपस्टिकचा डाग
एपिसोडच्या शेवटी गौतम पुनीत आणि डिम्पी हे सोनालीविषयी बोलताना दिसले, की ते लग्जरी बजेटसाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी सोनालीने त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. गौतमने असेही सांगितले, की सोनालीने त्याला गेम संपल्यानंतर डेट करण्यास सांगितले. सोनाली त्याच्याविषयी इतकी उत्साही होती, तिने त्याच्या मानेवर आणि गालावर किस करून लिपस्टिकचा डाग लावला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 75व्या दिवसाची छायाचित्रांतून झलक...