आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: उपेनने करिश्माकडून स्विमिंग पूलची तर डिंपीकडून करुन घेतली टॉयलेटची स्वच्छता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्विमिंग पूल स्वच्छ करताना करिश्मा आणि टॉयलेटची साफसफाई करताना डिंपी)
मुंबईः बिग बॉसच्या घरात 'हीरोज वर्सेस व्हिलन'चा खेळ रंगला. या खेळाअंतर्गत इम्युनिटी मिळवण्यासाठी गौतम, करिश्मा, डिंपी आणि अलीला सुपरहीरो बनवण्यात आले तर इतर स्पर्धक व्हिलनच्या भूमिकेत होत. हीरोजना व्हिलन टीमच्या सदस्यांना त्यांच्या नावाचा टॅग घालण्यासाठी कन्विंन्स करायचे होते. असे करण्यात हीरो टीमच्या ज्या सदस्यांना अपयश येईल तो या टाक्समधून आऊट होणार होता. यावेळी अलीने उपनेला त्याच्या नावाचा टॅग घालण्यासाठी खूप विनवण्या केल्या. मात्र उपेनने असे केले नाही.
उपेनने याचे कारण सांगताना म्हटले, की तो डिंपीला पाठिंबा देण्यासाठी असे करणार नाही. अखेर सोनालीने डिंपी, पुनीतने गौतम आणि प्रणितने प्रीतमच्या नावाचा टॅग घातला. खूप विनवण्या केल्यानंतर उपेनने करिश्माच्या नावाचा टॅग घातला. मात्र केवळ मैत्रीखातर आपण असे करत असल्याचे उपेनने यावेळी म्हटले. मात्र भविष्यात पुन्हा असे करणार नाही, असेही तो म्हणाला. यावरुन करिश्मा आणि उपेनमध्ये बराच वाद झाला. यावेळी अलीच्या नावाचा टॅग कुणीही घातला नसल्याने तो या टास्कमधून बाहेर पडला.
उपेनने करिश्माला पूल तर डिंपीला करायला सांगितली टॉयलेटची सफाईः
इम्युनिटीसाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दुसरा टास्क देण्यात आला. याचे नाव होते 'सब धुरंदर हॉटेल के अंदर'. टास्कसाठी घराचे रुपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले होते. डिंपी, करिश्मा, प्रीतम आणि गौतमला वेटर बनवण्यात आले, तर उपेन, पुनित, प्रणित, अली आणि सोनाली गेस्ट बनले होते. यावेळी गेस्ट बटलर्सकडून कोणतेही काम करुन घेऊ शकत होते. या मोबदल्यात बटलर्सना काही पैसे टिपच्या रुपात मिळणार होते. ज्याच्याकडे अधिक पैसे जमा होतील, तो या टास्कचा विजेता ठरणार होता. विजेत्याला मिळणा-या विशेषाधिकारातून त्याला बटलर टीममधून एका सदस्याला रेसबाहेर करता येऊ शकत होते.
टास्कवेळी उपेनने स्विमिंग पूलमध्ये भरपूर दगड टाकले आणि करिश्माला त्याने पूल स्वच्छ करण्याचा आदेश दिला. त्यानंतर डिंपीला त्याने टॉयलेट स्वच्छ करण्यास सांगितले. दोन्ही बटलर्सनी आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण केले. अखेर या टास्कचा विजेता प्रीतम ठरला आणि त्याने डिंपीला इम्युनिटी रेसमधून नेहमीसाठी बाहेर काढले.
करिश्मासोबत मैत्रीच्या मूडमध्ये नाही उपेनः
इम्युनिटीसाठी बिग बॉसने घरातील सदस्यांना शेवटची संधी दिली. त्याचे नाव होते हायजॅक. या टास्कनुसार, गौतम, प्रितम आणि करिश्माला खुर्चीवर बसायचे होते, तर इतर सदस्यांना त्यांना उचलायचे होते. तिघांपैकी जो शेवटपर्यंत खुर्चीवर टिकून राहिल, तो या टास्कचा विजेता ठरणार होता. या टास्कमध्ये विजेता कोण ठरणार याचा निर्णय गुरुवारी होणार आहे.
पुढे काय?
बुधवारी प्रीकॅपमध्ये दाखवण्यात आले, की हायजॅक टास्कवेळी प्रीतम आणि डिंपीत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी डिंपी प्रीतमला शिवीगाळ करताना दिसली. असो, आता पुढे काय ड्रामा घडणार, हे गुरुवारच्या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 87व्या दिवसाची खास झलक फोटोजमध्ये...