आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss Analysis: करिश्मा गौतमला म्हणाली, 'घटिया इन्सान'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नताशा, सोनी सिंह, सोनाली आणि करिश्मा तन्ना)
'बिग बॉस'मध्ये Day 16 'बब्बर्स वर्सेस लांबा' फॅमिलीचे 'लग्जरी टास्क' केव्हा 'हातापाई टास्क' बनले कळालेच नाही. सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यात आलेला टास्क तू-तू, मे-मेपर्यंत पोहोचला. करिश्मा आणि मिनिषा यांच्यात दरी वाढत चालली आहे. दुसरीकडे, पुनीत इस्सरलासुध्दा मिनिषाचे वागणे खटकत आहे. दीपशिखा आज शांत दिसली. आजच्या एपिसोडसाठी आमच्याकडून 3 स्टार...
पुनीतला आला राग
पुनीत टास्कदरम्यान जबरदस्ती केल्याने भडकला होता आणि त्याने गार्डनच्या परिसरात ठेवलेल्या टेबलवर लात मारली. त्यानंतर लगेच, पुनीत त्याच्या जवळच्या प्रणित भट्ट आणि प्रीतमला स्त्रीया चरित्रम, पुरुषस्य भाग्यम...च्या माध्यमातून समजावताना दिसला. पुनीत, मिनिषावर नाराज झाला. तो गेममध्ये नाते सोडून पुढे जाताना दिसत आहे.
टॉम अँड जेरी
टास्कदरम्यान करिश्मा गौतमवर भडकली. एवढेच नव्हे, करिश्मा त्याच्याकडून बांगड्या घेऊ शकली नाही म्हणून तिने गौतमला 'घटिया इन्सान' म्हटले. झाले असे, की करिश्मा गौतमकडून बांगड्या घेण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यावेळी गौतमने करिश्माच्या खांद्यावर डोके ठेवले. करिश्मा प्रत्येक छोट्या गोष्टीचा वादंग उभा करते. तिने त्याच नादात गौतमला घटिया म्हटले.
गौतममध्ये दम आहे
गौतम गुलाटी शोच्या सुरुवातीपासून स्वत:ला उत्कृष्ट मनोरंजक समजत आहे. मग ती एकट्याने हीरोच्या स्टाइलमध्ये गाणे गाण्याची गोष्ट असो अथवा हाऊसमेट्सपासून दूरावा निर्माण करून एकट्यात रडणे-पडणे किंवा अॅक्शन अवतारात किरकीर करणे. गौतमने आतापर्यंत खूप मनोरंजन केले. परंतु पुढे तो शोमध्ये काय करणार हे येत्या एपिसोड्समध्येच समजेल.
आर्यचा मिनिषा आणि करिश्माशी पंगा
गौतमला टास्कदरम्यान जबरदस्ता केल्याने मिनिषा, करिश्माला समजावत होती तोच करिश्मा मिनिषाशी वाद घालायला लागली. मिनिषा आणि करिश्मा यांच्यात मागील काही एपिसोड्समध्ये पटत नव्हते. मिनिषा आणि करिश्मा एकमेकींवर टिका करत होत्या. दुसरीकडे, आर्य बब्बरचेसुध्दा मिनिषाशी खटके उडत आहेत आणि तो करिश्माची बाजू घेण्यासाठी वादाच्या मैदानात उतरला. बिचारा आर्य...खोटे प्रेम व्यक्त करण्याची गोष्ट मिनिषाने स्वीकार केली नाही तर काहीतरी तिला भोगावेच लागेल ना. आजच्या एपिसोडमध्ये मिनिषा आणि सोनाली, करिश्मावर नाराज दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा Day 16ची निवडक छायाचित्रे...