आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Analysis Of Sonali Came Into The New House

BB08 Analysis: पुनरागमन करताच सोनालीने साधला करिश्मावर निशाणा, अडचणीत गौतम-पुनीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करिश्मा तन्ना आणि सोनाली राऊत)
मुंबई: 'बिग बॉस'च्या घरात सोनाली राऊतचे पुनरागमन हाउसमेट्ससाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही... सोनालीच्या पुनरागमनाने हाउसमेट्समध्ये एकप्रकारची भिती निर्माण झाली आहे. सोबतच, काहींच्या चेह-यावर आनंद दिसून आला. करिश्मा तन्ना आणि दीपशिखा, सोनालीच्या पुनरागमनाने सर्वात जास्त दु:खी दिसल्या. तसेच, गौतमला 13 लोकांनी नॉमिनेट करून बाहेर जाणा-यांमध्ये सर्वात मजबूत सदस्य बनवले. आज सोनालीचे पुनरागमन आणि शेवटी गौतम-सोनालीचा रोमान्स हे पाहणे रंजक होते... म्हणून शोसाठी 2 स्टार...
गुलामी नाही पटली
प्रीतमची टीम टास्कच्या मजबूरीमुळे दीपशिखाच्या टीमची गुलामी करत आहे, मात्र गुलाम बनणे त्यांना मनातल्या मनात खटकत आहे... यावेळी मागील दोन दिवसांत खेळाचे समीकरणसुध्दा बदलले दिसत आहे. आर्य बब्बर सुरक्षित खेळ खेळून करिश्मा आणि दीपशिखाशी जवळीक वाढवताना दिसत आहे. तसेच, मिनिषासुध्दा याच खेळात सर्वात जास्त रुची दाखवत आहे. गंमतीशीर गोष्ट अशीही आहे, की आतापर्यंत दीपशिखाची टीमचेच सर्वाधिक मेंबर्स 'बिग बॉस'च्या रेसमध्ये पुढे दिसत आहेत. प्रीतमच्या टीममध्ये कर्णधारच कमकुवत आहे. सोनी त्यांची साथ निभावत आहे. दुसरीकडे, गौतमच्या डोक्यावर नॉमिनेशनची तलवार लटकत आहे.
त्रिकूट: करिश्मा, डिआंड्रा आणि दीपशिखा
शोमध्ये आता करिश्मा, डिआंड्रा आणि दीपशिखा यांच्यात बरीच स्पर्धा चालू आहे. आर्य बब्बरसुध्दा करिश्माशी जवळीक वाढवत त्यांच्या त्रिकूटामध्ये घूसत आहे. आर्य बब्बर आणि करिश्मा फ्रॉम द डे 1 गेमला खूपच वेगळ्या रितीने खेळत आहेत. अर्थातच, जिकडे पारडे जड वाटते, तिकडे त्याची बाजू दिसते, की स्वत:चे पारडे जड करून घेतोय, हे कळणे कठिण आहे. उपेन, सुशांत आणि मिनिषाचे काय जिकडे पारडे भारी दिसले तिकडच्या बाजूने जायचे.
प्रणित, जर टिकला तर...
नॉमिनेशमध्ये गौतमनंतर सर्वात जास्त 09 हाउसमेट्सने प्रणितला व्होट दिले. जर प्रणितला लोकांची वाचवले तर तो पुढेदेखील हाउसमेट्सच्या नजरेत येणार आहे. एकिकडे, पुनीत, इस्सरलासुध्दा करिश्मा आवडत नाही. ते करिश्माच्या प्रत्येक गेमला समजू लागले आहेत.
सोनालीच्या निशाण्यावर करिश्मा
शोमध्ये परतल्यानंतर सोनालीने सर्वप्रथम करिश्माला निशाणा बनवले. वारंवार सोनाली करिश्माच्या जवळ बसलेला गौतमचे गोडवे गाताना दिसली. शेवटी गौतमसोबत डुएट गाऊन आपली उपस्थिती दाखवायला लागली. करिश्माला सोनालीने इशारासुध्दा केला, की ती दोन एपिसोड्स पाहून परतली आहे. सोनाली अनेकांच्या नजरेत आहे तर काहींच्या मनावर राज्य करत आहे.
डिआंड्राचा कलरफुल अवतार
डिआंड्रा सुरुवातीला गौतमशी जवळीक वाढवताना दिसली, परंतु आता घरातील वातावरण जसे-जसे बदलत जात आहेत, डिआंड्रानेसुध्दा स्वत:चा रंग बदलला आहे. अर्थातच, तिने दाखवून दिले, की संधीसाधू राहणे खेळात गुन्हा आहे. डिआंड्रा पुढेदेखील संधी पाहून रंग बदलताना दिसणार आहे. आता शोमध्ये तिची प्रतिस्पर्धी सोनालीचीसुध्दा एंट्री झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा Day 11ची काही निवडक छायाचित्रे...