आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Analysis: Sonali And Upen Fall In Love With Each Other

Bigg Boss Analysis: सोनाली-उपेनचा सायलेन्ट रोमान्स, गौतमला केले साइडलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उपेन आणि सोनाली)
'बिग बॉस'मध्ये तुम्ही Day 17मध्ये पाहिले, की 'बब्बर्स वर्सेस लांबा' फॅमिलीला दिलेला लग्जरी टास्कदरम्यान करिश्मा अनेकदा आक्रमक झालेली दिसली. एवढेच काय, करिश्मा आणि मिनिषा काही वेळ वाद घालताना दिसल्या. एकमेकींच्या माघारी त्यानी टिकादेखील केल्या. दुसरीकडे, आर्य आणि डिआंड्रासुध्दा पूर्णत: करिश्माच्या बाजूने दिसला. अखेर, सोनाली उपेनची झाली आणि टास्क लांबा फॅमिलीने जिंकला. आमच्याकडून आजच्या कंटाळवाण्या एपिसोडसाठी 2 स्टार...
टास्क V/S दूरावा
'लांबा वर्सेस बब्बर्स' फॅमिली यांच्यातील टास्कने अनेकांच्या मनात एकमेकांविषयी मतभेद निर्माण करून गेला. करिश्माचा परफॉर्मन्स पाहून स्पष्ट झाले, की सध्या गौतमनंतर घरात मजबूत स्पर्धक कुणी असेल तर ती म्हणजे करिश्मा. तिची जादू अनेक हाऊसमेट्सवर चालत आहे. करिश्मा आणि मिनिषा यांच्यात या टास्कने दूरावा निर्माण केला आहे. या टास्कचा राग नॉमिनेशनच्या आठवड्यात बाहेर पडू शकतो.
सोनाली-उपेनची लुपाछपी
सोनाली जेव्हा घरात आल्यानंतर एक चांगला जोडीदार शोधत आहे. सुरुवातीला सोनाली गौतमसोबत प्रेमाचा खेळ खेळताना दिसली. आता कदाचित उपेन आणि सोनाली एकमेकांच्या जवळ येण्याची शक्यता आहे. टास्कच्या निमित्ताने दोघे एकमेकांची पसंत-नापसंत शेअर करताना दिसले. एक गोष्ट स्पष्ट आहे, की या टास्कने अनेकांचे चेहरे फुगले, मात्र उपेन-सोनाली यांच्यात जवळीक वाढली.
प्रणितला खटकते आरडाओरडा
प्रणित भट्ट टास्कमध्ये त्याची इच्छा नसल्यासारखा खेळतो. प्रणित करिश्मा खटकते आणि हे या टास्कदरम्यान पाहायला भेटले. प्रणित आणि करिश्मा यांच्यात मैत्री व्हायला हवी, कारण त्यांचा रोमान्स पाहणे अनेकांना रंजक वाटेल.
सोनाली आणि करिश्मामध्ये 36चा आकडा
मिनिषाच नव्हे सोनालीलासुध्दा करिश्माचा अंदाज पटत नाही. जेव्हा कधी करिश्मा फेअर-फेअर म्हणून ओरडते, त्यावेळी सोनालीच्या चेह-यावरचे हावभाव पाहण्यासारखे असतात. सोनाली असेच उपेनशी बोलताना दिसली, की करिश्माकडे पाहून ती एखाद्या फालतू शाळेत शिकलेली दिसते.
हृतिकचा 'बँग बँग' टास्क
उद्या (10 ऑक्टोबर) हृतिक 'बिग बॉस'च्या घरात येणार आहे. प्रोमो पाहून वाटते, की उद्याचा एपिसोड रंजक असणार आहे. हृतिक आपल्या 'बँग बँग डेअर'च्या अंतर्गत घरातील सदस्यांना काचेवर चालण्यापासून लोखंडाच्या रॉडला गळ्याने मोडण्यापर्यंतचा टास्क देणार आहे. आता हा टास्क खरंच उत्सूकता निर्माण करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा Day 17ची काही छायाचित्रे...