आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Season 8: Sana Khan Lavish Villa's Inside Photos

Inside Photos: पाहा 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक सना खानचे आलिशान घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या घराबाहेर लागलेली नावाची पाटी दाखवताना अभिनेत्री सना खान)
मुंबईः गेल्याच आठवड्यात अभिनेत्री सना खान 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वातून बाहेर पडली. हल्लाबोल या सीरीजमधून सनाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती. मात्र येथे ती आपले कौशल्य दाखवण्यात कमी पडली. खरं तर सना बिग बॉसच्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. शेवटपर्यंत ती शोमध्ये टिकून राहिली होती. यावेळी ती सलमान खानची आवडती स्पर्धक ठरली होती. मात्र या पर्वात दुस-याच आठवड्यात तिला घराबाहेर पडावे लागले.
2014मध्ये सलमान खानच्या 'जय हो' या सिनेमात सना मोठ्या पडद्यावर झळकली होती. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या सना मुंबईत अंधेरी परिसरात वास्तव्याला असून अलीकडेच येथे तिने स्वतःचे घर घेतले आहे.
मुंबईत स्वतःचे घर घेणे होते स्वप्न..
सनाने 2BHK फ्लॅट दोन वर्षांपूर्वीच खरेदी केला आहे. सना सांगते, ''ही जागा माझ्यासाठी खूप खास आहे. चांगल्या लोकेशनवर घर खरेदी करण्याचे माझे स्वप्न होते. मनासारखे घर शोधण्यासाठी मला तीन वर्षे लागली. यापूर्वी मी भाड्याच्या घरात राहात होती. मुंबईत घर घेण्याचे माझे स्वप्न होते. आता माझे स्वप्न पूर्ण झाले असून हे घर मी कधीही विकणार नाही.''
स्वतःच केले घराचे इंटेरियर...
सनाने सांगितले, "घराचे इंटेरियर करण्यासाठी कोणत्याही आर्किटेक्टची मदत मी घेतली नाही. घराची संपूर्ण सजावट मी माझ्या मनाप्रमाणे कली आहे. ब्लॅक-व्हाइट संकल्पना घेऊन ही सजावट करण्यात आली आहे."
सनाच्या मते, घरात जेवढी मोकळी जागा असेल, तेवढी पॉझिटिव्हिटी घरात येते. तिचे घर बघून अनेक मित्र-मैत्रिणींना तिला त्यांचे घर सजवण्याची विनंती केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सना खानच्या सुंदर घराची खास छायाचित्रे...
सर्व छायाचित्रेः अजीत रेडकर