आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bigg Boss Contestants Who Found Love In This Reality Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'Bigg Boss'मध्ये यांच्या प्रेमाला फुटले अंकुर, मात्र काही काळातच तुटले नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चे 8वे पर्व संपले आणि अनेक गोष्टी आठवणीत ठेवून गेले. टीव्ही अभिनेता गौतम गुलाटी या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉसला टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो मानले जाते. येथे स्टार्समध्ये भांडण, हाथापाईपासून आणि रोमान्स, इंटीमेट होण्यापर्यंत सर्व काही घडते. स्टार्समध्ये घडणा-या या घटना ख-या असतात, की शोचा टीआरपी वाढवण्यासाठी असतात हे सांगता येत नाही.
गौतम-डिआंड्राचा रोमान्स-
या शोच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक जोड्यांच्या प्रेमाचा अंकुर घरात उमलला आहे. या पर्वातसुध्दा गौतम गुलाटी आणि डिआंड्राचा रोमान्स सर्वाधिक चर्चेत राहिला. एवढेच नव्हे, डिआंड्राच्या प्रेग्नेंट होण्याच्या बातम्यासुध्दा समोर आल्या होत्या. मात्र डिआंड्रा घरातून एविक्ट झाल्याने या चर्चांवर पूर्णविराम लागला. गौतमने शो संपल्यानंतर सांगितले होते, की डिआंड्रा त्याची चांगली मैत्रीण आहे आणि नेहमी राहणार.
उपेन आणि करिश्मा झाले होते इंटीमेट-
शोची रनर-अप ठरलेली करिश्मा तन्ना आणि उपेन पटेलसुध्दा बिग बॉसच्या घरात रोमान्स करताना दिसले. दोघांना इंटीमेट झालेलेसुध्दा पाहिल्या गेले होते. शोमध्ये करिश्माने सर्वांसमोर उपेनचे प्रेम व्यक्त केले होते. आता घराबाहेर आल्यानंतर दोघे कोणते नाते कायम ठेवणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
आतापर्यंत बिग बॉसच्या घरात अनेक स्टार्सचे प्रेम फुलले आहे. काही सिंगल स्टार्स आपला जोडीदार निवडण्यात यशस्वी ठरले तर काही अपयशी...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिग बॉसच्या मागील पर्वांतील अशाच काही जोड्यांविषयी, ज्यांचे प्रेमप्रकरण राहिली चर्चेत...