आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एजाजवर भडकली गौहर, म्हणाली \'बंद कर हा प्रेमाचा ड्रामा\', एजाजने गिळले सोफियाचे सर्व औषध !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स वाहिनीवरील 'बिग बॉस' हा शो आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. कारण हा शो संपायला आता केवळ तीन ते चार आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे स्पर्धक केवळ आपले वर्तनच सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, तर घरात राजकारणसुद्धा चांगलेच रंगत आहे.
शोच्या 85व्या दिवशीसुद्धा घरात काहीसे असेच वातावरण होते. 85व्या दिवशी घरात कडाक्याचे भांडण झाले नाही, मात्र दोन चांगल्या मित्रात वादाची ठिणगी पडली आणि ते राजकारणाला बळी पडले. यादिवशी अरमान आणि कुशाल यांनी त्यांच्यातील भांडण संपुष्टात आणले. मात्र काम्या आणि संग्राम यांच्यात वाद निर्माण झाला.
याशिवाय एजाज, कुशाल आणि गौहरने एकत्र येऊन एक नाटक रचले. त्यांनी घरच्यांना सांगितले, की एजाजने सोफियाची सर्व औषधं खाल्ली. त्यामुळे घरातील सर्वजण काळजीत पडले. एजाजसुद्धा जबरदस्ती उलटी करुन आपली तब्येत ठिक नसल्याचे सर्वांपुढे दर्शवत होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 85व्या दिवशी घरात कोणकोणत्या घडामोडी घडल्या ते सांगत आहोत...