आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलीने केले अमन वर्माचे टक्कल, पुलमध्ये किथ-सुयशने केला रोमँटिक डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमन वर्मा, उजवीकडे किथ सेक्वेअरा रोशेल मारिया राव आणि सुयश राय
मुंबई- 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांच्या 24व्या दिवशी अनेक अदलाबदल झाले. लग्झरी बजेट टास्क 'हॉटेल BB9'दरम्यान किथ आणि रोशेलला रात्री पुलमध्ये डान्स करावा लागला. तसेच अमन वर्माला टक्कल करावे लागले. 'बिग बॉस'चे एक्स-स्पर्धक व्हीजे एंडी, अली कुली मिर्झा, सना खान हॉटेल BB9चे पाहूणे बनून आले होते. यादरम्यान त्यांनी हॉटेल स्टाफ (ऋषभ सिन्हा आणि मंदाना करीमीला सोडून)कडून विचित्र कामे करून घेतली.
एंडीने रोशेल आणि किथकडून पुलमध्ये डान्स करून घेतला-
BB9चा पाहूणा अली व्हीजे एंडीने रोशेल आणि तिचा बॉयफ्रेंड किथला आदेश दिला, की त्यांना पुलमध्ये रोमँटिक डान्स करावा. दोघांना एंडीचे मनोरंजन करण्यासाठी पुलमध्ये डान्स केला. यादरम्यान सुयशने 'लग जा गले' गाणे गायले.
अलीच्या आदेशानुसार अमनने केले टक्कल-
BB9चा पाहूणा अली कुली मिर्झाने स्पर्धकांना कठिण टास्क दिले. त्यामधील सर्वात कठिण टास्क होता अमनचे टक्कल करणे. अमनने हा टास्क पूर्ण केला. इतकेच नव्हे तर पाहूण्यांसाठी किथ आणि सुयशने तरुणींचा गेटअपसुध्दा केला. नंतर दोघांनी पुलमध्ये रोमँटिक डान्ससुध्दा केला.
मंदानाने दिगंगनाला स्विमसुट परिधान करण्यास सांगितले-
हॉटेल BB9 टास्कमध्ये पाहूण्याच्या भूमिकेत दिसलेल्या मंदानाने दिगंगना सूर्यवंशीला टास्क दिला, की तिने स्विमसुट घालावे. मात्र तिने असे केले नाही कर तिला BB9ची नोकरी सोडावी लागेल. दिगंगनाने स्विमसुट घालण्यास नकार दिला आणि नोकरी सोडली.
रिमीला दिले केस रंगवण्याचा आदेश-
अली कुली मिर्झा आणि सना खानने रिमी सेनला आदेश दिला, की तिने केस कलर करावे. मात्र रिमीने टास्क पूर्ण करण्यास नकार दिला आणि हॉटेल BB9ची नोकरी सोडली. अशाप्रकारे युविका चौधरीनेसुध्दा टास्क पूर्ण करण्यास नकार दिला आणि नोकरी सोडणे पसंत केले. पाहूण्यांनी तिला केस कापण्याचा टास्क दिला होता.
रोशलला दूर्लक्ष करून किथने केली सनाची प्रशंसा-
हॉटेल BB9मधून चेकआऊट करताना सना खानने किथला आदेश दिला, की त्याने तिची प्रशंसा करावी. किथ सनाला म्हणाला, तुझ्यासारखी सुंदर स्पर्धक आजपर्यंत बिग बॉसमध्ये आलेली नाहीये. यावेळी त्याने रोशेलला दुर्लक्षित करून सनाचे सौंदर्य सिध्द करण्यासाठी रोशेलची शप्पथ खाल्ली.
प्रिन्स आणि ऋषभचे भांडण-
24व्या दिवशी ऋषभ सिन्हा आणि प्रिन्स नरूलाचे यावेळी तू-तू मै-मै झाली. दोघे एकमेकांना डिवचताना दिसले. टास्कदरम्यान पाहूण्याच्या भूमिकेत असलेल्या ऋषभ सिन्हाने किश्वर मर्चेंटला कुत्रा बनवले होते. इतके नव्हे तर अमन वर्मा आणि किथ सेक्वेअरा यांना सोडून इतरांसोबतची त्याची वागणूक चूकीची होती. प्रिन्सला याचे वाईट वाटले. दोघांमध्ये भांडण झाले आणि ते एकमेकांना कोंबडा म्हणताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 24व्या दिवशी काय-काय झाले...
बातम्या आणखी आहेत...