आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमधून बाहेर पडताच ढिंचॅक पूजाला मिळाला हा शो, दर महिना कमावते ऐवढे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्रीने प्रवेश मिळालेली आणि लवकरच बाहेर पडलेली ढिंचॅक पूजा लवकरच एका नव्या शोमध्ये दिसणार आहे. या शोचे नाव आहे 'एंटरटेनमेंट की रात' या शोमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये दोन नव्या पाहुण्यांना निमंत्रित केले जाईल. दोघेही रॅप साँग द्वारे एकमेकांची खिल्ली उडवतील. जो शेवटपर्यंत मागे हटणार नाही, सहाजिकच तो विजेता ठरले आणि माइक सोडणारा पराभूत होईल. अशी माहिती आहे, की दीपिका कक्कड, मौनी रॉय, आदित्य नारायण आणि रवी दुबे या शोमध्ये दिसणार आहेत. शोची शुटिंग एक-दोन दिवसांत सुरु होणार आहे. 

 

कोण आहे ढिंचॅक पूजा 
- दिल्लीची ढिंचॅक पूजाचे खरे नाव पूजा जैन (23) आहे. पूजाचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे. रोहतकच्या मॉडेल स्कूलमधून तिने शिक्षण घेतले. आता ती गुरु गोविंदसिंग इंद्रप्रस्थ यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. 
- नुकतेच तिचे 'आफरीन बेवफा' गाणे रिलीज झाले होते.  गाणे अपलोड झाल्यानंतर 13 तासांमध्ये त्याला 60 हजार लोकांनी पाहिले होते. 

 

महिना 3 ते 50 लाख कमावते ढिंचॅक पूजा... 

बातम्या आणखी आहेत...