Home »TV Guide» Bigg Boss Ex Contestant Rahul Mahajan Home

दोन लग्न मो़डल्यानंतर या घरात एकटा राहतो राहुल महाजन, बघा घराचे INSIDE PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 11:07 AM IST

मुंबईः टीव्हीवरील 'राहुल दुल्हनिया ले जाएगा' आणि 'बिग बॉस 2' या रिअॅलिटी शोजमुळे प्रसिद्धीझोतात आलेला राहुल महाजन गेल्या 13 वर्षांपासून साऊथ मुंबईत वास्तव्याला आहे. राहुल मुंबईतील ज्या अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे, तेथे ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशन जास्त बघायला मिळते. त्याने घराला जास्त कलरफुल बनवलेले नाही. याविषयी राहुल सांगतो, "माझ्या मते, सर्वांनी घराला डेकोरेटिव्ह बनवण्यापेक्षा ते स्वच्छ ठेवण्यावर जास्त भर द्यायला हवा. मी अनेक घरांमध्ये महागड्या पेंटिंग्स आणि लॅव्हिश इंटेरिअर पाहिले आहे, मात्र तरीदेखील अशा घरांमध्ये काही तरी अपुर्ण असल्याचे जाणवते. तेथे कदाचित पॉझिटिव्हिटीचा अभाव असू शकतो." राहुल मुंबईतील वरळी भागात वास्तव्याला असून त्याच्या घराची किंमत सहा कोटींच्या घरात आहे.
काय म्हणाला राहुल...
राहुल पुढे म्हणाला, "घर हे प्रत्येकासाठी अशी एक जागा असते, जिथे प्रत्येक जण रिलॅक्स फिल करतो. मी घरात हाऊसहसबंडची भूमिका बजावत असतो. (हसून) सहसा घराची संपूर्ण जबाबदारी हाऊसवाईफवर असते. मात्र माझ्या बाबतीत अगदी विरुद्ध आहे. मी घरात अस्वच्छता मुळीच सहन करु शकत नाही."

घरातून दिसतो वरळी सी लिंकचा नजारा...
राहुल महाजनच्या घरातील एका भागातून वरळी सी लिंकचा नजारा दिसतो. राहुल सांगतो, "काही वर्षां पूर्वीपर्यंत सी व्यूपासून ते पक्ष्यांची किलबिलाट सर्वकाही मला माझ्या घरात एन्जॉय करता यायची. पण आता उंच इमारती तयार झाल्याने ब-याच गोष्टी बदलल्या आहेत. मात्र वरळी सी लिंकचा नजारा तेवढा आजही घराच्या बालकनीतून दिसतो. पण आता मी 360 डिग्री व्यू Miss करतो."

इंटेरिअर स्वतः राहुलने केले डिझाइन...
राहुलचे घर 950 स्वे. फुट आहे. घराचे इंटेरिअर स्वतः राहुलने डिझाइन केले आहे. तो सांगतो, "सुरुवातीला मी एक इंटेरिअर डिझायनर हायर केला होता. पण नंतर मी स्वतः घर डेकोरेट करायचे ठरवले. घरातील प्रत्येक गोष्ट माझ्या आवडीची आहे. टॉवेलपासून ते एअरफ्रेशनरपर्यंत सर्व गोष्टी मी स्वतः आणल्या आहेत. इतकेच नाही तर मेडला दररोज मी सल्ला देत असतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे मी होममेकर असून याचा मला अभिमान आहे."

पुढील स्लाईड्सवर बघा, राहुल महाजनच्या मुंबईतील घराचे अनसीन फोटोज...

Next Article

Recommended