आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टीव्ही अॅक्ट्रेसला एक्स बॉयफ्रेंडने भररस्त्यात केली मारहाण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सोनी सिंह)
मुंबई- 'बिग बॉस' फेम सोनी सिंहवर मुंबईच्या रस्त्यावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे, हा हल्ला तिच्या बॉयफ्रेंडने केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सोनीच्या एक्स बॉयफ्रेंडने सोमवारी रात्री (6 जुलै) तिच्या हल्ला केला. त्यावेळी ती आपल्या फ्रेंड्ससोबत वर्सोवामध्ये फिरण्यास निघाली होती.
प्रत्यक्षदर्शींनीच्या सांगण्यानुसार, 'सोनीच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला अचानक कारमध्ये ओढले. सोनीला कारमध्ये घेऊन त्याने तिला मारहाण केल्याचा आवाज येत होता. तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या शरीरावर जखमा केल्या. सोनीच्या फ्रेंड्सने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनीने त्यांना या प्रकरणापासून दूर राहण्यास सांगितले.' तिथे उपस्थित एका व्यक्तीने पोलिसांना बोलावले. काही वेळात पोलिस आले आणि त्यांना वर्सोना पोलिस ठाण्यात घेऊन गेले.' पोलिस ठाण्यात या प्रकरणाविषयी तक्रार दाखल करण्यात आली.
divyamarathi.comने जेव्हा याविषयी सोनीला विचारले तेव्हा तिने त्याचे खंडन केले. सोनीने सांगितले, 'हे एक खासगी प्रकरण आहे, मला याविषयी काहीच सांगायचे नाहीये. कृपया यावर कोणताही माहिती छापू नका.'
सोनी सिंह 'घर की लक्ष्मी बेटीया', 'सरस्वती चंद्र', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल'सारख्या शोमध्ये झळकलेली आहे. ती 'बिग बॉस 8'मध्येसुध्दा होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनीचे निवडक फोटो...