आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस 7'मधील ग्रँड फिनालेच्या काही आठवणी, बघा छायाचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 7'चा ग्रँड फिनाले दमदारपणे पार पडला आणि गोहरच्या विजयाने सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडले. कारण सर्वांना संग्राम जिंकणार असा अंदाजा होता पण त्याला ग्रँड फिनालेच्या दिवशी सर्वात पहिले घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर तनिषावर सर्वांच्या आशा टिकून होत्या पण त्याही फोल ठरल्या. तनिषा अरमानच्या नात्याने प्रसिध्द झाली होती. यांच्या नात्याची चर्चा बरेच दिवस चालू होती. यांच्याच सारख विजेती गोहर आणि कुशालच्या नात्यानेसुध्दा बरीच प्रसिध्दी मिळवली. या शोमध्ये प्रेम तर दिसून आलं पण प्रेमाबरोबरच वादही मोठ्या प्रमाणावर होता. संग्राम-अँडी, अरमान-सोफिया, गोहर-कुशाल, कुशाल-अँडी यांच्या वादाने सुध्दा या शोला चर्चेत ठेवलं. यामध्ये अरमान आणि सोफियाचा वाद पोलिसांपर्यत गेला. सोफियाने अरमान विरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक केली होती.
याचबरोबर ग्रँड फिनालेमध्ये सर्वांनी धमाकेदार सदरीकरण केलं. या आकर्षक प्रदर्शनाने 'बिग बॉस 7' ग्रँड फिनालेला चार चाँद लावले होते. 'बिग बॉस 7'चा फिनाले शनिवारी रात्री सलमान खान आणि एलीच्या डान्ससोबत धमाकेदार रुपात झाला. त्यानंतर अरमान कोपलीने सलमान खानसोबत डान्स केला आणि प्रत्यूषा, काम्यानेसुध्दा सलमानसोबत 'फेविकॉल से' गाण्यावर डान्स केला. सलमान खानने त्याची आवडती स्पर्धक एली अवरामसोबत माशाल्लाह माशाल्लाह या गाण्यावर डान्स केला. एलीने सोलो परफॉरमन्ससुध्दा केला. तिने 'ये मेरा दिवानापन', ''
हे आहेत 'बिग बॉस 7' ग्रँड फिनालेच्या काही आठवणी. आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून काही खास आठवणी दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'बिग बॉस 7'च्या ग्रँड फिनालेच्या काही आठवणी...