आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossमध्ये उडणार स्पर्धकांची खिल्ली, एकमेकांची नक्कल काढण्यासाठी बदलणार वेशभूषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पुनीत इस्सर आणि प्रीतम)
मुंबई: 'बिग बॉस'मध्ये तुम्ही हाऊसमेट्सना एकमेकांची मिमिक्री करताना अनेदा पाहिले असेल. 'बिग बॉस' अशाच एका फनी टास्कची घोषणा करत आहेत. या टास्कमध्ये हाऊसमेट्सना 2 तासात एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे. त्यासाठी आर्यला दिग्दर्शकाची भूमिका देण्यात आली आहे.
प्रीतम बनणार डिआंड्रा
या टास्कमध्ये अनेक गमतीशीर क्षण पाहायला मिळणार आहे. टास्कदरम्यान प्रीतमने डिआंड्राची भूमिका साकारली आहे. मिनिषा करिश्मा तन्ना बनणार आहे. शिवाय, पुनीत सुशांत बनणार आहे. करिश्मा पुनीतचे पात्र साकारत आहे. प्रनीत भट्ट गौतमच्या अवतारात दिसणार आहे. सोनाली बनणार नताशा, गौतम बनणार सोनाली, डिआंड्रा बनणार आर्य, सोनी बनणार प्रीतम, दीपशिखा बनणार प्रीतम, नताशा दिसणार उपेनच्या भूमिकेत, सुशांत बनणार दीपशिखा आणि उपेन साकारणार सोनीचे पात्र. हे सर्व एकमेकांच्या भूमिका साकारून मिमिक्री करताना दिसणार आहेत. आर्यसुध्दा मिनिषाची मिमिक्री करताना दिसणार आहे.
सुशांतच्या मिमिक्रीसाठी पुनीतने पायाचे केले व्हॅक्सिंग
पुनीत या टास्कमध्ये सुशांतची मिमिक्री करणार आहे. विशेष म्हणजे, या टास्कने पुनीतने पायाचे व्हॅक्सिंग केले. तसेच, गौतम, सोनालीच्या मिमिक्रीसाठी तिची पँट आणि जॅकेट घालणार आहे. मिमिक्री दमदार दिसण्यासाठी प्रीतमसुध्दा डिआंड्राच्या पिंक विगमध्ये दिसेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या हाऊसमेट्सने मिमिक्रीसाठी कसा बदला लूक...