आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिनालेपूर्वी संभावना घरातून OUT, हे आहेत या पर्वाचे टॉप 5 फायनलिस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गौतम गुलाटी आणि संभावना सेठ)
मुंबई- 'बिग बॉस हल्लाबोल' सिरिजच्या 24व्या दिवशी प्रीतम आणि गौतममध्ये जोरदार भांडण झाले. 'बिग बॉस'ने दिलेल्या एका टास्कमध्ये प्रीतमने गौतमवर राजकारण करत असल्याचा आरोप लावला. त्यामुळे गौतम भडकला. एकमेकांवर ओरडून बोलत असताना प्रीतम आणि गौतमने आपली मैत्री तुटली असेही म्हटले. प्रीतमने त्याला बोलता-बोलता वीर (पंजाबमध्ये छोटा भाऊ) म्हटले, तेव्हा गौतमने त्याला रागात सांगितले, 'मला वीर म्हणू नकोस'. दोघांच्या भांडणात अलीने मध्यस्ती केली. मात्र गौतम त्याच्यावरही भडकला. यावेळी दोघांनी एकमेकांना धक्का-बुक्की केली. एवढेच नव्हे, रात्री उशीरासुध्दा गौतम आणि प्रीतम यांच्यात भांडण झाले. यावेळी दोघांचे भांडण दिलेल्या टास्कच्या नियमांवरून झाले. यादरम्यान अलीने गौतमला बनावट म्हणून संबोधले.
ब्रेकफास्ट स्वत: तयार करण्याचा निर्णय-
दुस-या दिवशी सकाळी प्रीतमने ब्रेकफास्टची ड्यूटी वाटून घेण्यास नकार दिल्यानंतर घरातील सदस्यांनी ठरवले, की प्रत्येकाने स्वत:चा नाश्ता बनवायचा. यावेळी गौतम आणि त्याच्या टीमला वाईट वाटले, की टास्कमुळे फूड आणि ड्यूटी प्रभावित होत आहेत, यासाठी त्याने प्रीतमला जबाबदार ठरवले.
25 लाख जिंकण्यासाठी काही तासच शिल्लक-
'बिग बॉस'ने घोषणा केली, की 25 लाख रुपयांची बॅग नावी करण्यासाठी चॅलेंजर्सकडे काही तासच शिल्लक आहेत. यादरम्यान अलीने विरुध्द टीमकडून बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु संभावनाने त्याला सल्ला दिला, की कोणतेच संकट अंगावर ओढून घेऊन नकोस. टास्क ड्रॉ झाला पाहिजे, अले संभावना आणि करिश्माचे म्हणणे होते. अखेर टास्कचा वेळ संपला आणि टास्क ड्रॉ झाला. 'बिग बॉस'ने सांगितले, की दोन्ही टीमकडे बॅग जिंकण्याची संधी बरोबरीची आहे. ही बॅग कशी जिंकायची हे पुढील एपिसोडमध्ये सांगणार आहे.
टॉप 5 फाइनालिस्टचा खुलासा-
'बिग बॉस'ने पुन्हा एकदा मिडनाइट एविक्शनची घोषणा करून सर्व सदस्यांना आश्चर्याचा धक्का दिला. संभावना सेठला फिनालेपूर्वी घरातून बाहेर काढण्यात आले. आता घरात केवळ पाच सदस्य बाकी आहेत. गौतम गुलाटी, प्रीतम प्यारे, करिश्मा तन्ना, डिम्पी महाजन आणि अली कुली मिर्झा हे या पर्वाचे टॉप 5 फाइनालिस्ट आहेत. 'बिग बॉस 8' पर्व कोण जिंकणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस हल्लाबोल'च्या 24व्या दिवशीची छायाचित्रांतून झलक...