आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss: Inside Photos Of Mister Gay Sushant Divgikar Party House

Inside Photos: Mister Gay सुशांतचा खास फ्लॅट, येथे नेहमीच होतात पार्ट्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुशांत दिव्गिकर आपल्या पार्टी फ्लॅटच्या बेडरुममध्ये)
मुंबई- 'बिग बॉस 8'चा माजी-स्पर्धक आणि मिस्टर गे (इंडिया 2014) सुशांत दिव्गिकर प्रत्येक दुस-या दिवशी शोमधून एविक्ट झालेल्या स्पर्धकांसोबत पार्टी करताना दिसतो. मात्र, त्याच्यासाठी पार्टीचे कोणतेच विशेष कारण नसते. ग्लॅमर इंडस्ट्रीचा प्रसिध्द चेह-यासोबतच सुशांत सायकोलॉजीचा विद्यार्थीसुध्दा आहे. त्याच्या सांगण्यानुसार, त्याला संधी मिळाली तर भविष्यात तो सायकोलॉजिस्ट होणार आहे.
divyamarathi.comसोबत बातचीत करताना सुशांतने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. त्याने सांगितले, 'मी आतापर्यंत फक्त वांद्रामध्ये राहिलो आहे. मी माझे शालेय शिक्षण वांद्राच्या विद्या मंदिरातून घेतले. पुढील शिक्षणसाठी मीठीबाई कॉलेजमधून पूर्ण केले. सोनाली राऊत कॉलेजमध्ये माझ्यासोबत होती. आम्ही एकाच बाकावर बसत होतो. परंतु विषय वेगवेगळे होते. मी माझे पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई यूनिव्हर्सिटीमधून केले. याशिवाय मी आणखी काही कोर्सेस केले आहेत. मी यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि IGNOUमधूनसुध्दा शिक्षण घेतले आहे. मी खूप शिक्षण घेतले.'
गे-लेस्बियन कम्यूनिटीचा तरुण चेहरा सोबतच, सुशांत आपल्या आई-वडिलांसाठी खूप भावूक आहे. तो सांगतो, 'माझे वडील कस्टम विभागाचे कमिश्नर आहेत आणि आई कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उच्च पदावर होती. आपल्या देशात तृतीयपंथींना समाजात वागणे खूप कठिण असते. मात्र, माझ्या आई-वडीलांना माझ्याबाबत काहीच तक्रार नाहीये. माझे आईवडील वेगळे विचाराचे आहेत. माझा मोठा भाऊ हॅम असून तो आपल्या संसात व्यस्त आहे.'
मुंबईमध्ये सुशांतचे दोन फ्लॅट्स आहेत, त्यामधील एक पार्टी करण्यासाठी ठेवलेला आहे. सुशांत सागतो, 'माझा आणखी फ्लॅट वर्सोवामध्ये आहे आणि तो माझ्यासाठी खूप खास आहे. मी याला पार्टी फ्लॅट म्हणतो. मी येथे दोनदा माझा वाढदिवस साजरा केला आणि न्यू इअरसुध्दा सेलिब्रेट करतो. या फ्लॅटमध्ये अनेक ग्लॅमर इंडस्ट्रीच्या आठवणी आहेतय मी नाव नाही सांगू शकत, परंतु अनेक लोकांनी या फ्लॅटमधून डेटींग सुरु केली. ही खूप सुंदर जागा आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुशांतच्या पार्टी हाऊसचे INSIDE PHOTOS...
सर्व फोटो- अजीत रेडकर