आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: रात्रीच्या अंधारात जवळ आले उपेन-करिश्मा, Kiss करत घालवले इंटीमेट क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एकमेकांना किस करताना करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल)
मुंबई- बिग बॉसच्या घरात सध्या लव्ह बर्ड्स करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल यांची लव्ह स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे. शुक्रवारी (हल्लाबोल सीरिजच्या 12व्या दिवशी) करिश्मा आणि उपेन इंटीमेट क्षण एकत्र घालवताना दिसले. रात्री घरातील दिवे बंद झाल्यानंतर करिश्मा आपल्या बेडवरुन उठून उपेनच्या बेडवर गेली. बराच वेळ एकत्र घालवल्यानंतर दोघे एकमेकांना स्मूच करताना दिसले. दुस-या दिवशी करिश्माने घरच्यांसमोर उघडपणे आपल्या प्रेमाची कबूली दिली. मात्र जेव्हा प्रीतमने करिश्माला उपेनसोबत लग्न करणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा लग्नाविषयी अद्याप विचार केला नसल्याचे तिने सांगितले. घराबाहेर पडल्यानंतर उपेनसोबत भेट घेऊन विचारांती लग्नाचा निर्णय घेणार असल्याचे करिश्माने म्हटले.
विशेष म्हणजे आपला एक बॉयफ्रेंड असल्याचे करिश्माने अनेकदा घरात सांगितले आहे. त्यामुळे उपेनसोबतची तिची वाढत चाललेली जवळीक प्रश्न उपस्थित करणारी आहे. शोचा टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात आलेला हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. असो, शो संपल्यानंतर करिश्मा आणि उपेन यांच्या नात्यातील सत्य उघड होणारच आहे.
...तर यासाठी उपेनसोबत जवळीक वाढवतेय करिश्माः
करिश्माने घरातील सदस्यांसमोर हे स्वीकारले, की उपेन तिला हवा तसा मुलगा आहे. शो संपल्यानंतर त्याच्यासोबत डेट करणार असल्याचे तिने डिंपी, संभावना आणि सनाला सांगितले. विशेष म्हणजे करिश्माचा बॉयफ्रेंड ऋषभ चोकसीला बिझनेसला मोठे नुकसान झाले, तेव्हापासून तिने त्याच्यापासून दुरावा निर्माण केला असल्याचा खुलासा डिंपीने या शोमध्ये केला. सना, संभावना, डिंपीला गॉसिप करताना बघितले गेले. या तिघींच्या मते, करिश्माला केवळ पैश्यात इंट्रेस्ट आहे. इतकेच नाही तर ऋषभ चोकसीला आपल्या गर्लफ्रेंडला नॅशनल टीव्हीवर अशाप्रकारे वागताना बघून किती दुःख होत असेल याचाही विचार करताना या तिघीजणी दिसल्या.
कॅप्टनपदासाठी निवडणूकः
शुक्रवारी घरातील नवीन कॅप्टनसाठी निवडणूक घेण्यात आली. कॅप्टन पदासाठी योग्य नसलेल्या दोन व्यक्तींची निवड करण्याची जबाबदारी बिग बॉसने करिश्मावर सोपवली होती. बराच विचार केल्यानंतर करिश्मा आणि महकच्या नावांची निवड करण्यात आली. तर अली, प्रीतम आणि संभावना यांच्यात कॅप्टनपदासाठी चुरस रंगली. अलीचा विजय झाला आणि तो चौथ्यांदा घरातील कॅप्टन बनला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा उपेन-करिश्माचे इंटीमेट क्षण आणि सोबतच हल्लाबोल सीरीजच्या 12व्या दिवसाची खास झलक...