आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss: Meet The Airporty Jallad Of Chintan Gangar

भेटा Bigg Bossमध्ये गंभीर दिसणा-या एअरपोर्टी जल्लादला, खासगी आयुष्यात आहे हसतमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चिंतन गंगर सलमान खानसोबत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान, 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा होस्ट होता. मात्र आता तो हा शो होस्ट करत नाहीये. सलमानचा 'वीकेंड का वार' एपिसोड्स प्रत्येकाला आवडतो, मात्र हा आडवण्याचा आणखी एक कारण म्हणजे, या एपिसोडमध्ये येणारा एअरपोर्टी जल्लाद. सलमान त्याच्यासोबत नेहमीच धमाल-मस्ती करताना दिसायचा. नेहमी गंभीर मूडमध्ये दिसणा-या जल्लादला पाहून लोकांना आपोपाआप हसू यायचे. परंतु तुम्हाला माहित आहे का? गंभीर दिसणारा जल्लाद रिअल लाइफमध्ये खूप रिलॅक्स आणि मनमोकळा आहे.
divyamarathi.comने टीव्हीवरील या जल्लाद अर्थातच चिंतन गंगरसोबत बातचीत केली. त्याने सांगितले, 'माझे वय 27 वर्षे आहे आणि मुंबईमध्ये आपली आई (चेतना रामजी गंगर)सोबत राहतो. 16 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले. मला गायला, डान्स करायला आणि नाइट आऊट करायला आवडते. माझ्या कुटुंबात 1500 सदस्य आहेत. (माझ्या आई-वडील दोघांकडचे नातेवाईक मिळून) 'बिग बॉस'मध्ये जल्लादची भूमिका साकारणे माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता. सलमानने माझा पहिला अभिनय पाहिल्यानंतर तो खूप प्रभावित झाला.'
चिंतनच्या सांगण्यानुसार, 'रिअल लाइफमध्ये जल्लाद खूप वेगळा आहे. मला नेहमी हसत राहायला आवडते. कितीही संकट आले तरी मला आनंदी राहायला आवडते. शूटिंगदरम्यान मी कधीच रिटेक घेतले नाही आणि मला कोणी हसवूच शकत नाही. मला वाटते, मी माझ्या हसण्यावर नियंत्रण ठेऊ शकतो, हे एक गॉड गिफ्टच आहे. परंतु मी जेव्हा स्टेजच्या मागे जातो, तेव्हा लोटपोट हसतो.'
चिंतन 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात दिसला होता आणि निर्मांत्याची इच्छा होती, की त्याने आठव्या पर्वात कान करू नये. मात्र, सलमानच्या विनंतीनंतर त्याला या पर्वात घेण्यात आले. चिंतन सांगतो, 'सलमान सहकार्य करणारा व्यक्ती आहे, मी स्वत: नशीबवान समजतो, की मला सलमानसारखा गॉड फादर मिळाला. तो मला नेहमी प्रोत्साहित करतो. मी जे कार्य करू शकतो त्यात तो मला पाठिंबा देतो. त्याच्यामुळेच मी या शोमध्ये आहेत. सलमान एक समजदार आणि चांगली व्यक्ती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने बिग बॉसच्या सेटवर बर्थडे साजरा केला होता.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चिंतन गंगरच्या खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे...