(फाइल फोटो : गौतम गुलाटी)
मुंबईः
बिग बॉसच्या आठव्या पर्वातील सर्वात चर्चेत राहणारा चेहरा म्हणजे गौतम गुलाटी. खासगी आयुष्यात गौतम कुटुंबवत्सल असल्याचे त्याचा थोरला भाऊ मोहित गुलाटीने divyamarathi.comसोबत बातचित करताना सांगितले.
मोहित म्हणाले, "बालपणी गौतम खूपच खट्याळ होता. मात्र त्याने नेहमी
आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले. याच कारणामुळे त्याचे मित्र फार कमी आहेत. तो लाजाळू स्वभावाचा आहे. मी त्याच्यापेक्षा वयाने दीड वर्षे मोठे असल्याने त्याच्यावर नेहमी वरचढ ठरलो. आम्हा दोघांचाही स्वभाव खूप वेगळा आहे. मात्र आमचे नाते मजबूत आहे."
मोहित पुढे सांगतात, "बिग बॉसमध्ये एन्ट्री घेण्यासाठी गौतमने 'दीया और बाती हम' ही मालिका सोडली. तो खूप मेहनती आहे. बिग बॉसमध्ये तो प्रामाणिकपणे खेळ खेळतोय. त्याने उचललेले पाऊल योग्य ठरले याचा मला आनंद आहे. तो या शोचा विजेता ठरवा अशी माझी इच्छा आहे. तो माझा भाऊ आहे म्हणून नव्हे तर तो अतिशय योग्य पद्धतीने हा खेळ खेळतोय, म्हणून तोच जिंकावा असे मला वाटते."
मोहित यांच्या मते, गौतमव्यतिरिक्त प्रीतम या शोचा विजेता ठरु शकला असता, मात्र आता तसे दिसत नाही. मोहित यांनी इतर स्पर्धकांविषयीसुद्धा चर्चा केली. त्यांच्या मते, करिश्मा सेल्फिश आणि अली भ्रष्ट व्यक्ती आहे. तर डिंपी शोमध्ये खूप चांगले करु शकली नाही. जर निर्मात्यांनी अन्याय केला नाही, तर गौतम या शोचा नक्की विजेता ठरु शकेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गौतमची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे. (काही छायाचित्रांमध्ये गौतम आई आणि थोरल्या भावासोबत दिसत आहे.)