लघवी केल्यानंतर प्रिया मलिक, तिच्यासोबत किश्वर मर्चेंट
मुंबई- 'बिग बॉस'च्या या सीजनमध्ये टास्क जिंकण्यासाठी स्पर्धक प्रत्येक पध्दती वापरत आहेत. गुरुवारीच्या (26 नोव्हेंबर) एपिसोडविषयी बोलायचे झाले तर नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धक प्रिया मलिकने पँटमध्ये लघवी केल्याचा प्रकार घडला. झाले असे, की 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना एक इम्युनिटी टास्क दिला होता. या टास्कमध्ये दिगंगना सूर्यवंशी, मंदाना करिमी आणि रिमी सेन यांना सोडून इतर सदस्यांना भाग घ्यायचा होता. त्यासाठी स्पर्धकांना गार्डन एरियामध्ये ठेवलेल्या कारमध्ये वेळ घालवायचा होता.
अट होती, की जो सर्वाधिक वेळ कारमध्ये घालवेल त्याला टास्कचा विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. विजेत्याचा घरातील नवीन कॅप्टन बनवण्यात येणार होते. सोबतच पुढील दोन आठवड्यांच्या नॉमिनेशनमध्ये इम्युनिटी देण्यात येणार होती. टास्कदरम्यान प्रियाला बाथरुमला जायचे होते, मात्र ती कंट्रोल करू शकली नाही. तिने कारच्या बाहेर जाण्याऐवजी सर्वांसमोर पँटमध्ये लघवी केली. तरीदेखील ती टास्क खेळत होती.
कारमध्ये प्रियाशिवाय प्रिन्स नरूला, किश्वर मर्चेंट, रोशेल मारिया राव आणि सुयश रायसुध्दा उपस्थित होते. टास्कमध्ये टिकून राहण्यासाठी प्रियाने असे केले. अखेर, तिला सर्वकाही सहन करावे लागले. यादरम्यान सुयशची तब्येत बिघडली आणि त्याने टास्क सोडण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या एपिसोडची खास छायाचित्रे...