आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss: Salman Khan Was Leave The Show Because Of Its Format

जाणून घ्या, सलमानने कोणत्या कारणामुळे सोडले \'Bigg Boss\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- 'बिग बॉस 8'मध्ये सलमानचा शेवटचा दिवस, सोबत गौतम गुलाटी)
मुंबई- 'बिग बॉस हल्ला बोल' सीजन शेवटच्या आठवड्यात पोहोचला आहे आणि 31 जानेवारी रोजी या शोचा ग्रँड फिनाले आहे. या सिरिजला दिग्दर्शिका फराह खान होस्ट करत आहे. यापूर्वी हे पर्व सलमान खान होस्ट करत होता हे सर्वांनी पाहिले. मात्र 105व्या दिवशी त्याला शो सोडावा लागला. सलमानने शो सोडण्याचे कारण 'बजरंगी भाईजान' सिनेमाचे शूटिंग होते असे सांगितल. मात्र ताज्या बातम्यांनुसार, सलमानचे शो सोडण्याचे कारण वेगळेच होते.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, सलमानने सिनेमाचे शूटिंगसाठी नव्हे 'बिग बॉस'च्या नवीन फॉर्मेटमुळे शोला अलविदा म्हटले. सूत्रांनी सांगितले, की 'हल्लाबोल' या पर्वाचा भाग नव्हता. परंतु निर्मात्यांनी या सिरिजला शोमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला होता. निर्मात्यांच्या या निर्णयाने सलमान नाराज झाला आणि त्याने पुढील शो होस्ट करण्यास नकार दिला.
'हल्लाबोल' सिरिजमध्ये अली-एजाजचे भांडण, संभावना-डिम्पीचा वाद, करिश्मा-उपेनचा रोमान्ससारख्या अनेक गोष्टी घडल्या. या कारणांची शोचा TRP वाढला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस 8'मधील सलमानचा शेवटचा प्रवास...