आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss: Things, Which Marred The First Time In The History

कधी थोबाडीत, कधी फेकून मारले बूट, Bigg Bossच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्या या घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सोनाली राऊत अली कुली मिर्झाच्या थोबाडीत मारताना. खालील छायाचित्रात संभावना सेठ आणि डिम्पी महाजन. दोघींमध्ये संभावनाने फेकलेला बूट)
मुंबई- रिअॅलिटी शो 'बिग बॉस हल्लाबोल'चा फिनाले 31 जानेवारी रोजी आहे. हा शो 'बिग बॉस 8' नावाने सुरु झाला होता, मात्र 105व्या दिवशी एक नवीन सिरिज सुरु करून या शोला 'बिग बॉस हल्लाबोल' असे नाव देण्यात आले. 'बिग बॉस'च्या इतिहासात असे पहिल्यांदा घडत असावे. एवढेच नव्हे या पर्वात अनेक गोष्टी आहेत, ज्या 'बिग बॉस'च्या या पर्वात पहिल्यांदाच घडल्या. divyamarathi.com आज तुम्हाला अशाच 9 गोष्टी सांगत आहेत...
शोच्या इतिहासात पहिल्यांदा घुमला 'थप्पड'चा आवाज-
'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात एक एपिसोडदरम्यान सोनाली राऊतने अली कुली मिर्झाला थोबाडीत मारली होती. ही संपूर्ण घटना नॅशनल टीव्हीवर दाखवण्यात आली होती.
अलीने प्रणित भट्ट आणि पुनीत इस्सर समोर सोनालीविषयी अपशब्दांचा वापर केला होता. याविषयी पुनीतने सोनालीला सांगितले. सोनालीने हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर भडकली आणि अलीच्या कानशिलात लगावली. परंतु नंतर बातमी आली होती, की सोनालीने शोचा टीआरपी वाढवण्यासाठी असे केले होते. त्यासाठी तिला निर्मात्यांनी पैसे दिले होते. मात्र, सोनालीने सर्व बातम्यांना नाकारले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'मध्ये पहिल्यांदाच घडलेल्या घटना...