आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big Boss Analysis: सोनाली-करिश्मामध्‍ये होऊ शकतो संघर्ष, लव्ह गेमही सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक सीझनमध्‍ये प्रेम युगलांची कमी नसते. यावेळीही ब‍िग बॉस सीझनच्या पहिल्या दिवशी उपेन पटेल आणि सुकृती कांडपालमध्‍ये प्रेमाच्या गप्पा ऐकावयास मिळाल्या. सुकृतीस उपेन लाडाने सुक्कू अशी हाक मारताना दिसला. पण येणारे काळच सांगेल की, या दोघांचे संबंध कितपत गोड राहतील. दोघांकडे पाहिल्यानंतर असे वाटते, की त्यांनी ब‍िग बॉस शोचा खूप अभ्‍यास केला असावा. कारण त्या दोघांना माहीतेय, मागील सीझनमध्‍ये सो कॉल्ड कपल्सनी सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेले आहे आणि दीर्घकाळा करिता शोमध्‍ये ती टिकली होती.

सोनाली आणि करिष्‍मा यांच्या असेल 36 आकडा
शोमध्‍ये सोनाली राऊत आणि करिष्‍मा तन्ना या दोघींनी भले बरोबर प्रवेश केला असेल. पण त्यांचे बिग बॉसच्या घरात पटेलच याबाबत सांगता येत नाही. स‍िक्रेट सोसायटीने जेव्हा एक टास्कमध्‍ये स्पर्धकांचे मत जाणून घेतले, तेव्हा कर‍िष्‍माने सगळ्यात दुर्बळ स्पर्धक म्हणून सोनालीचे नाव घेतले. ती म्हणाली, भविष्‍यात माझी लढाई सोनालीबरोबर होऊ शकते.

शकुनी मामा खेळू शकतात लांब पल्ला
पहिल्याच दिवशी सिक्रेट सोसायटीचे प्रणीत उर्फ शकुनी मामाने घरातील लोकांना खुले आव्हान दिले. ते म्हणाले, कोणीही समोर यावे आणि माझ्याकडून टास्क करुन घ्‍यावे. सोसायटीच्या सदस्यांनी ही गोष्‍ट आवडली नाही.शेवटच्या 6 सदस्यांचे लगेज थांबवण्‍यात आले नंतर ते देण्‍यात आली. प्रणीतलाही लगेज दिले गेले नाही.पण याबाबत त्याने कोणतीही तक्रार केली नाही.या घटनेने सिध्‍द होते की प्रणीत पुढे चांगली कामगिरी करेल.

सिक्रेट सोसायटीही नाही सुरक्षित
आजचा एपिसोड बारकाईने पाहिल्यास एक गोष्‍ट सिध्‍द होते की, सिक्रेट सोसायटीही असुरक्षित आहे. सोसायटीतील तीन सदस्यांवर मॉनिटरिंग केले जात आहे. जर त्यांच्यातील कोणी वीक द‍िसला तर यावर बिग बॉस आपला निर्णय देतील. आश्‍चर्य वाटून देऊ नका जेव्हा 12 सदस्यांवर अधिराज्य गाजवणारे सिक्रेट सोसायटीचे सदस्य याच 12 सदस्यांमध्‍ये टास्क करुन आपले स्थान शोमध्‍ये सुरक्षित करताना दिसतील.

पुढील स्लाइड्सवर पाहा बिग बॉसची काही छायाचित्रे...