आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Big Boss Analysis: कुठे रोमान्स, तर कुठे कपटनीतीला सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः आर्य बब्बर आणि सोनी सिंग)
मुंबई - दुस-या दिवशी बिग बॉस 8 मध्‍ये स्पर्धक रडताना, रोमान्स करताना दिसले.चला तर पाहु स्पर्धकांनी घरात काय-काय केले... (BIGG BOSS-8: पहिल्या दिवशी काय होते खास, वाचा आणि Pixमध्ये पाहा झलक)

डिआंड्रा आणि गौतम गुलाटीचा रोमान्स
सिक्रेट सोसायटीच्या दुस-या दिवशी कुर्बानी टास्क अंतर्गत डिआंड्रा सॉरेस आणि सुशांत दिग्विकर यांना स्टॅच्यू टास्क देण्‍यात आले. त्यानुसार दोघांना चालण्‍या- फ‍िरण्‍यास बंदी होती. एकाच पोझ‍िशनमध्‍ये त्यांना टास्क पूर्ण करायचे होते. ते पूर्ण झाल्यानंतर गौतम गुलाटी डिआंड्राच्या पायाचा मसाज करताना दिसला.

आर्य बब्बर कळीचा नारायण
आर्य बब्बर घरातील सदस्यांमध्‍ये भांडणे लावताना दिसला. गौतम गुलाटी, सोनी सिंह आणि करिष्‍मा तन्ना यांची तो बढाई करत होता. ही गोष्‍ट गौतमच्या निदर्शनास आली. आर्यने आपण किती चांगले आहोत हे दाखवण्‍यासाठी चक्क जेवण केले नाही.त्याच्याकडे पाहुन वाटते तो लंबी रेस का घोडा ठरणार आहे.

शकुनी मामाचे मोहरे
कुर्बानी टास्कमध्‍ये सर्वप्रथम पुढाकार शकुनी ऊर्फ प्रणीतने घेतला. पण त्याला कोणताही प्रतिसाद न देता सिक्रेट सोसायटीने त्याच्याऐवजी सोनी स‍िंहला टास्क पूर्ण करण्‍याची सूचना दिली. शकुनी मामाची प्रत्येक कृती पाहुन असे वाटते की तो असा उतावळेपणा जाणीवपूर्वक करित आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्यांचा आवडता व्यक्ती म्हणून प्रणीत स्वत:ला प्रोजेक्ट करताना दिसत आहे. मात्र भविष्‍यात स्पष्‍ट होईल.. नेमके शकुनी मामाच्या डोक्यात कोणते नियोजन चालू आहे.

उपेनचे प्रेम
उपेनने प्रथम सुकिर्तीला रडायला लावले आणि नंतर तिला शांतही केले. दुस-या दिवशी दोघांच्या प्रेमाची एक्स्प्रेस सुसाट धावत होती. तिचा वेग किती राहिल हा प्रत्येकाच्या उत्सुकतेचा विषय राहणार आहे.

सुशांत दिग्विकरचे काय होणार ?
मिस्टर गे सुशांत दिग्विकर 'बिग बॉस'च्या घरातील सर्वांच्या मनोरंजनाचा साधन बनला आहे. तो सध्‍या आपले मित्र शोधत आहे. डिआंड्राच्या रूपात सुशांतला बहीण मिळाली. पण बिग बॉसच्या घरातील पुरुषमंडळींशी त्याचे सूत कसे जुळते हे येणा-या काळात कळले. (BIGG BOSS-8 : ...आणि उपेन ओरडल्यामुळे सुकिर्तीला कोसळले रडू, पाहा Day-2 in Pix)
पुढील स्लाइड्सच्या माध्‍यमातून पाहा बिग बॉसच्या घरातील दुस-या दिवसाची क्षणचित्रे...