आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big Boss Analysis: घरातील सदस्य दाखवू लागले आपापले रंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस'च्या घरात तिस-या दिवशी सिक्रेट सोसायटीच्या सदस्यांच्या रहस्यावरुन पडदा उठला.दुसरीकडे डिआंड्रा आणि गौतमची प्रेम नौका पुढे जात आहे. आर्य बब्बर आणि करिष्‍मा तन्ना आपले फासे फेकत आहे.सुरुवातीस प्रणीत कपड्यांबाबत त्रासलेला दिसला.
शो जसा पुढे सरकू लागला तसे 'बिग बॉस'ने घरच्या सदस्यांना सूट दिली.सिक्रेट सोसायटीने सदस्यांना किचन वापरण्‍यास परवानगी दिली. एकंदरीत काय तर प्रेक्षकांना 'बिग बॉस'च्या ताटात प्रेम, भावना, दोस्ती, कपटनीती आणि राग असे नाना पदार्थ वाढून ठेवले होते. आजच्या (बुधवार) एपिसोड्सला आमच्याकडून 5 पैकी 3 स्टार्स... चला तर पाहु तिस-या दिवसातील क्षण‍दृश्‍य.. (BIGG BOSS-8: गौतम-डिआंड्रामध्ये फुलले प्रेमाचे अंकुर, पाहा Day-3 in Pics)

'क्यूट हार्ट' आणि 'स्वीटहार्ट'चा रोमान्स
तिस-या दिवशी डिआंड्रा आणि गौतमी गुलाटीच्या प्रेमाची नौका आणखी पुढे सरकली. दोघे शोमध्‍ये आतापर्यंत सार्वजनिकरित्या प्रेमाची ढोल वाजवत आहेत.पण बिग बॉसच्या घरात टिकून राहण्‍यासाठी ही गौतम गुलाटीची व्युहरचना असू शकते. तो आणि उपेन यांच्यातील संवाद हेच सांगत आहे. असे असताना 'क्यूट हार्ट आणि स्वीटहार्ट दोघेही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. (Big Boss Analysis: सोनाली-करिश्मामध्‍ये होऊ शकतो संघर्ष, लव्ह गेमही सुरु)

आर्य बब्बर आणि करिष्‍मा या दोघांव्यतिरिक्त इतरही छुपे रुस्तम आहेत...
कार्यक्रमाच्या पहिल्या आणि दुस-या दिवशी आर्य बब्बर आणि करिष्‍मा तन्ना सर्वात धूर्त दिसले. पण तिस-या दिवशी गौतम गुलाटीने ही बोलता-बोलता आपली भविष्‍यातील रणनीती जाहीर केली. मिन‍िषा लांबा आणि डिआंड्राही रंग दाखवत आहेत. दुसरीकडे मैत्रीचे निमित्त करुन सोनी स‍िंह इतर सदस्यांना समजून घेत आहे. तिस-या दिवशी नताशा, सुशांत आणि सोनाली राऊत शांत दिसले. पण आत त्यांचे काय खलबते चालू आहे हे मात्र माहित नाही.

किंग/क्वीन ऑफ चालुगिरी
आर्य पहिल्या दिवसापासून चालुगिरीच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. मात्र कर‍िष्‍मा तन्ना तिस-या दिवशी सर्वांची बॉस असल्याची दिसत होती. उपेन पटेलने बिझनेस क्लासच्या आपल्याऐवजी सुकृतीला नॉमिनेट केले. हे सर्व पाहुन असे वाटते की किंग/ क्वीन ऑफ चालुगिरीचे मुकूट कोणाच्या डोक्यावर विराजमान होईल हे का‍ठीण आहे. सर्व का‍मगिरी पाहिल्यानंतर आमच्या वतीने हा मान करिष्‍मा तन्नाला दिला जात आहे. आर्य आणि करिष्‍मा पत्ते वाटत आहे. सध्‍या ते बरोबर आहेत.

अँग्री बुल: कोणालाही शिंगाने मारणारा
गौ‍तम पुढे जाऊन शोमध्‍ये खटके उडवताना दिसेल. स्वत:चा अॅटीट्यूड आणि स्वत:चेच बरोबर असल्याचे सिध्‍द करणारा गौतम पुढेही बिग बॉसमध्‍ये शिंगाने मारताना दिसेल.

सायलन्ट प्लेयर: गुपचुप-गुपचुप गेम
बिग बॉसच्या घरात अनेक सायलन्ट प्लेयर्स आहेत. मिन‍िषा लांबाने आपल्यावरील शांततेचा बुरखा हळुहळू काढण्‍यास सुरुवात केली आहे. परंतु सोनाली राऊत, नाताशा, सोनी सिंह, सुकृती आणि उपेन पटेल यांचे पत्ते अद्याप उघडलेले नाही. त्यांचा खरा चेहरा येणा-या दिवसात पुढे येईल.

सिक्रेट सोसायटीचे सदस्यांनी एंट्री केल्यानंतर काय हाईल ?
सध्‍या सिक्रेट सोसायटीचे सदस्य सर्वांच्या हालचाली पाहता आहेत. आता या सोसायटीतील सदस्यांमध्‍ये एकमेंकांविषयी कूरबूर नसेल पण जेव्हा ती प्रत्यक्ष खेळात उतरतील तेव्हा काय होईल? अनेकांची गुपिते समोर येतील.

सर्वात नाटकी कोण ?
आम्हाला वाटते आजचा ( बुधवार) एपिसोड पाहून तुम्हाला सर्वात नाटकी प्रणीत ऊर्फ शकुनी मामा मुळीच दिसला नसेल. सर्वात नाटकी व्यक्तिच्या शर्यतीत आर्य बब्बर, करिष्‍मा तन्ना आणि आता डिआंड्रा आहे. तुम्ही आम्हाला सांगा कोण आहे सर्वात नाटकी..तसेच तिस-या दिवसाचा एपिसोड आणि 5 पैकी किती स्टार्स आपण देणार.....
( छायाचित्र: करिष्‍मा तन्ना आणि आर्य बब्बर)